दोन दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक, व्यवसायिक जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2022 19:30 IST2022-03-14T19:29:59+5:302022-03-14T19:30:15+5:30
बॅंकेच्या कामानिमित्त वैजापूर येथे आलेले व्यवसायिक जागीच ठार झाले

दोन दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक, व्यवसायिक जागीच ठार
वैजापूर- वैजापूर-गंगापूर रस्त्यावर भगूर फाटयाजवळ सोमवारी दुपारी दोन मोटारसायकलची समोरा समोर धडक होऊन एक जण जागीच ठार तर दोन जण जखमी झाले. अपघातात गंगापूर येथील व्यावसायिक संजय मच्छिंद्र साबणे (५३) यांचा मृत्यू झाला.तर दिलीप रत्तनलाल मंत्री (५५) रा.गंगापूर व ज्ञानेश्वर खंडेराव काळे (५५) रा.मांजरी हे दोघे जखमी झाले.
संजय साबणे हे बॅंकेच्या कामानिमित्त वैजापूर येथे आले होते.कामकाज आटोपून साबणे हे त्यांच्या मोटार सायकल (एम एच २० सी ए २७१५) वर दिलीप मंत्री यांच्यासोबत परततहोते. त्यावेळी समोरुन येणाऱ्या ज्ञानेश्वर काळे यांच्या मोटार सायकल( एम एच २० एफ एल ९३७९) ची समोरासमोर जोरदार धडक झाली.
या अपघातात संजय साबणे यांचा जागेवर मृत्यू झाला.तर मंत्री व काळे हे दोघे जखमी झाले. यातील दिलीप मंत्री हे गंभीर जखमी असून त्यांना अधिक उपचारासाठी औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
घटनेची माहीती मिळताच माजी नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी,संजय जाधव,काॅग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत सदाफळ,वाल्मीक शिरसाठ यांनी घटनास्थळी भेट देऊन मदतकार्य केले.हवालदार व्ही आर बाम्हदे ,गुणवंत थोरात यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.अपघाताची विरगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.