गिरीजानदीत बुडून दोन शाळकरी मित्रांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 12:04 IST2019-08-02T12:00:50+5:302019-08-02T12:04:42+5:30

मध्यंतरात दोघेही नैसर्गिक विधीसाठी बाहेर पडली

Two seven-year-old school friend drowned in Girija river | गिरीजानदीत बुडून दोन शाळकरी मित्रांचा मृत्यू

गिरीजानदीत बुडून दोन शाळकरी मित्रांचा मृत्यू

औरंगाबाद : वडोदबाजार येथील गिरीजा नदी पात्रात बुडून सात वर्षीय दोन शाळकरी मित्रांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. २ ) सायंकाळी उघडकीस आली. तमजील मोबीन शेख ( १४ ) आणि मिनाज अनिस शेख (१४ ) असे मृत मुलांची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तमजील मोबीन शेख आणि मिनाज अनिस शेख हे दोघे गुरुवारी दुपारी शाळेत गेले होते. मध्यंतरात नैसर्गिक विधीसाठी दोघेही शाळेच्या जवळील गिरीजा नदी पात्रा शेजारी गेले. यावेळी एकजण नैसर्गिक विधी करत असताना पाय घसरून पात्रात पडला. हे पाहताच दुसरा त्याला वाचविण्यासाठी धावला मात्र दोघेही त्यात बुडाली. 

दरम्यान, सायंकाळी दोन्ही मुले घरी आली नसल्याने त्यांचा शोध सुरु झाला. नातेवाईकांना पात्राजवळ चपल दिसल्यानंतर त्यांचा शोध घेण्यात आला. यावेळी रात्री एका मुलाचा मृतदेह सापडला, तर दुसऱ्या मुलाचा मृतदेह आज पहाटे सापडला. दोन्ही मुलांचा मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी दिली आहे. 

Web Title: Two seven-year-old school friend drowned in Girija river