शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

By admin | Updated: April 1, 2015 01:00 IST

येणेगूर / अचलेर : शाळा सुटल्यानंतर शेतात कामाला गेलेल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला.

येणेगूर / अचलेर : शाळा सुटल्यानंतर शेतात कामाला गेलेल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी अचलेर (ता.लोहारा) शिवारात घडली.घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील सलगरा (मड्डी) येथील अरुण तानाजी जाधव (वय ११) व बळीराम सुरेश राठोड (वय ११) हे दोन्ही मुले गावातीलच जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतात़ अरूण जाधव व बळीराम राठोड हे दोघे मंगळवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी आले होते़ आई-वडिल गावाजवळ असलेल्या अचलेर शिवारात मजुरीने कामाला गेल्याचे समजल्यानंतर ते दोघे त्यांना भेटण्यासाठी शेताकडे निघाले होते़ हे दोघे अचलेर शिवारातील भीमराव ठेंगील यांच्या शेताजवळ आले असता तहान लागल्याने शेततळ्यात पाणी आणण्यासाठी ते उतरले़ प्रारंभी हातातील बाटली भरून बाहेर काढून ठेवल्यानंतर ते पाणी पिण्यासाठी पुन्हा शेततळ्यात उतरले होते़ मात्र, त्यावेळी त्यांचा पाय घसरल्याने तळ्यातील पाण्यात पडल्याने बुडून दोघांचा मृत्यू झाला़ दरम्यान, या घटनेची आकस्मित मृत्यू म्हणून मुरूम पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विलास गोबाडे व विलास राठोड करीत आहेत़ या घटनेने सलगरा मड्डी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे़ (वार्ताहर)