वेरूळ घाटात दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक, महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 18:17 IST2025-07-11T18:16:41+5:302025-07-11T18:17:06+5:30
कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

वेरूळ घाटात दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक, महिलेचा मृत्यू
खुलताबाद: वेरूळ घाटात आज शुक्रवारी दुपारी अडीच वाजता दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. या घटनेत एका मोटारसायकलवर बसलेल्या महिलेच्या डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला.
रूईखेडा (ता. कन्नड) येथील गोरख जाधव व त्यांची पत्नी विमल गोरख जाधव या छत्रपती संभाजीनगरहून खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार करून घरी गावाकडे मोटारसायकल क्रमांक (एम एच २० डी- ए एक्स २०१३) ने जात असतांनी खुलताबाद नजीक वेरूळ घाटात समोरून येणा-या मोटारसायकलने जोरदार धडक दिली.
यात मागे बसलेल्या विमल जाधव (वय ४६) रस्त्यावर पडल्याने डोक्याला जबर मार लागला. दरम्यान लोकांनी खाजगी वाहनाने त्यांना खुलताबाद ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिका-यांनी तपासून मयत घेषित केले. बीट जमादार शेख जाकीर, किशोर गवळी यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून ग्रामीण रूग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू होते.