कन्नडजवळ ट्रक-रिक्षा अपघातात दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 14:20 IST2018-10-10T14:20:24+5:302018-10-10T14:20:55+5:30
सोलापुर-धुळे महामार्गावर ट्रक व लोडींग रिक्षा यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले,

कन्नडजवळ ट्रक-रिक्षा अपघातात दोन ठार
कन्नड (औरंगाबाद ) : शहरापासुन जवळ सोलापुर-धुळे महामार्गावर ट्रक व लोडींग रिक्षा यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले, तर तीन जण जखमी झाले. आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
ट्रक (क्रमांक एपी ०२ टीए १११६) हा औरंगाबादकडून चाळीसगावकडे तर लोडींग रिक्षा (क्रमांक एमएच २० डीई ३८३२) ही चाळीसगावकडून औरंगाबादकडे चालली होती. या विरुध्द दिशेने धावणाऱ्या दोन्ही वाहनांची कन्नड औरंगाबाद रस्त्यावर एका ढाब्याजवळ समोरासमोर धडक झाली. यात रिक्षामधील शेख मोहंमद सादेक मोहंमद मुसा (४२) रा.शरीफ कॉलनी औरंगाबाद व इबादउल्लाखान असदउल्लाखान (२५) रा.कैसरकॉलनी औरंगाबाद हे जागीच ठार झाले तर मिलींद भालेराव रा.मुकूंदवाडी औरंगाबाद हा जखमी झाला. तसेच ट्रकमधील एस राममुर्ती व के व्यंकटरामन हे जखमी झाले. जखमींवर घाटी रूग्णालयात उपचार सुरु आहेत.