औरंगाबादजवळ कार आणि कंटेनरच्या अपघातात दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 12:35 IST2018-12-19T12:33:55+5:302018-12-19T12:35:03+5:30

 या अपघातामध्ये कारचा चेंदामेंदा झाला होता.

Two killed in car and container accident near Aurangabad | औरंगाबादजवळ कार आणि कंटेनरच्या अपघातात दोघांचा मृत्यू

औरंगाबादजवळ कार आणि कंटेनरच्या अपघातात दोघांचा मृत्यू

औरंगाबाद : औरंगाबादजवळ कार आणि कंटेनर यांच्यात झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दौलताबाद टी पाँईट ते माळीवाडा दरम्यान पहाटे चार वाजेच्या ही दुर्घटना घडली. पराग कुलकर्णी आणि अरूण काकडे अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. 

पराग कुलकर्णी हा मूळचा नाशिकचा रहिवासी आहे. गेली काही वर्ष कामानिमित्ताने शहरातील तारांगण कासलीवाल इथल्या जी-5 सेक्टरमध्ये राहत होता. पराग हा कामानिमित्ताने मित्रासोबत बाहेर गेला होता. काम संपवून घरी परत येत असताना हा अपघात झाला आहे.  या अपघातामध्ये कारचा चेंदामेंदा झाला होता. क्रेन मागवून ही कार रस्त्यातून बाजूला करावी लागली. 

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दोघांना घाटी रुग्णालयात दाखल केलं. तिथे डॉक्टरांनी दोघे मृत झाल्याचं घोषित केले. पराग आणि अरुण दोघेही एका फायन्स कंपनीत कामाला होते.

Web Title: Two killed in car and container accident near Aurangabad