शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तुळजापुरात दोघांचे अपहरण

By admin | Updated: October 28, 2014 00:58 IST

तुळजापूर : बाप-लेकास मारहाण करीत गाडीत घालून अपहरण केल्याप्रकरणी आठ जणाविरूध्द तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली़

तुळजापूर : बाप-लेकास मारहाण करीत गाडीत घालून अपहरण केल्याप्रकरणी आठ जणाविरूध्द तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली़याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तुळजापूर येथील हुडको परिसरात उमा माने या कुटुंबासह राहतात़ त्यांचा मुलगा अभिषेक माने व पती राजेंद्र माने यांना सोमवारी सकाळी गावातीलच विशाल छत्रे, अमित अरगडे, सुरज साठे, अतुल कदम, मनोज गवळी, योगेश दळवी, नेताजी दळवी, संभाजी पलंगे व इतरांनी मागील भांडणाची कुरापत काढून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गाडीत घालून पळवून नेल्याचे उमा राजेंद्र माने यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे़ या फिर्यादीवरून वरील आठ जणाविरूध्द तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सदर घटनेचा अधिक तपास फौजदार बुवा हे करीत आहेत़ (वार्ताहर)येरमाळा : दुचाकीस जोराची धडक देत दोन ठार तर एकास गंभीर जखमी केल्याप्रकरणी कार चालकाविरूध्द येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ हा अपघात रविवारी सायंकाळी तेरखेडा (ता़वाशी) नजीक घडला होता़ याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तेरखेडा येथील सुरज आगलावे (वय-१९), विष्णू महादेव माळी (वय-१९) व बबन राजेंद्र कडवकर हे तिघे रविवारी सायंकाळी दुचाकीवरून (क्ऱएम़एच़१३-एक्स ७३७६) वरून गावाकडे जात होते़ त्यावेळी वाहनाला ओव्हरटेक करून समोरून आलेल्या इंडिका कारने (क्ऱएम़एच़०४- वाय़६९०७) दुचाकीस जोराची धडक दिली़ या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुरज आगलावे, विष्णू माळी या दोघांचा जागीच मृत्यू झाला़ तर बबन कडवकर हा गंभीर जखमी झाला़ याबाबत अमोल जगन्नाथ आगलावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारचालकाविरूध्द येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोहेकॉ जगताप हे करीत आहेत़