कार अपघातात दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 20:46 IST2018-12-25T20:46:01+5:302018-12-25T20:46:15+5:30
जालन्याहून औरंगाबादकडे जाणाऱ्या भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्यालगत असलेल्या नाल्यात जाऊन आदळली.

कार अपघातात दोन जखमी
करमाड : जालन्याहून औरंगाबादकडे जाणाऱ्या भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्यालगत असलेल्या नाल्यात जाऊन आदळली. यात दोन जण जखमी झाले. ही घटना करमाड शिवारातील रोहिदासनगर जवळ सोमवारी रात्री घडली.
कार (एम. एच. २० ए जी ५०१२) ही जालन्याहून औरंगाबादकडे जात होती. करमाड शिवारातील रोहिदासनगर जवळ चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार रस्त्यालगत नाल्यात जाऊन धडकली. यात अण्णा जमाजी शेवगावकर (५५ रा.भावसिंगपुरा,औरंगाबाद) हे जखमी झाले. तर चालक किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी जखमींना औरंगाबाद घाटी रुग्णालयात दाखल केले.