शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचे दोन कर्मचारी बडतर्फ

By admin | Updated: July 7, 2014 00:20 IST

नांदेड : महापालिकेतील बीएसयुपी विभागातील दोन कर्मचाऱ्यांना आर्थिक गैरव्यवहाराच्या कारणावरून आयुक्त जी़ श्रीकांत यांनी सेवेतून बडतर्फ केले़ तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचेही आदेश दिले़

नांदेड : महापालिकेतील बीएसयुपी विभागातील दोन कर्मचाऱ्यांना आर्थिक गैरव्यवहाराच्या कारणावरून आयुक्त जी़ श्रीकांत यांनी सेवेतून बडतर्फ केले़ तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचेही आदेश दिले़ बीएसयुपी विभागातील विजय मोहन तोटावाड हे वसुली लिपिक म्हणून काम पाहतात़ लाभार्थ्यांकडून वसूल केलेल्या रक्कमेतून ४ लाख ८५ हजार ५०० रूपयांचा अपहार करून ही रक्कम कार्यालयात उशिराने भरणा केली़ त्यामुळे त्यांना यापूर्वीच निलंबित केले होते़ विभागीय चौकशी अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर दोषारोप सिद्ध केल्याचा अहवाल सादर केला़ त्यानुसार विजय तोटावाड यांना महापालिका सेवेतून लिपिक या पदावरून पुढे नोकरी मिळण्यास सामान्यपणे अपात्र होईल, अशा प्रकारे सेवेतून कायमचे बडतर्फ करण्याचे आदेश आयुक्तांनी ४ जुलै रोजी दिले़ दुसऱ्या प्रकरणात मनपाचे कर्मचारी राजू मुंजाजी कांबळे हे क्षेत्रिय कार्यालय क्रं़ ३ मध्ये कार्यरत होते़ मालमत्ताधारकांकडून मालमत्ता कराची वसूल केलेली रक्कम महापालिकेकडे वर्ग न करता त्यांनी अपहार केला होता़ त्यामुळे त्यांनाही निलंबित केले होते़ विभागीय चौकशीत त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले़ त्यामुळे राजू कांबळे यांना मनपा सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश दिले़ (प्रतिनिधी)