ठाण्यात हजेरी न लावण्यासाठी आरोपीकडून लाच घेणारे दोन हवालदार जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 07:30 PM2021-03-17T19:30:42+5:302021-03-17T19:30:55+5:30

या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Two constables arrested for taking bribe for not attending police station | ठाण्यात हजेरी न लावण्यासाठी आरोपीकडून लाच घेणारे दोन हवालदार जेरबंद

ठाण्यात हजेरी न लावण्यासाठी आरोपीकडून लाच घेणारे दोन हवालदार जेरबंद

googlenewsNext

औरंगाबाद: एमआयडीसी सिडको ठाण्यात दागीने हडपल्याचा गुन्हा दाखल असून, सदरील गुन्ह्यात हजेरी न लावण्याच्या कारणासाठी तसेच आरोपीला तपासात मदत करण्यासाठी ५ हजाराची लाच घेणाऱ्या दोन हवालदारांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बुधवारी रंगेहाथ अटक केली.

शेख अफसर शेख इलोमोद्दीन (५२,रा. हुसेन कॉलनी) तर रत्नाकर पुंडलीक बोर्डे (५०,रा. म्हाडा कॉलनी, मुर्तीजापूर) असे अटक हवालदारांची नावे आहेत. शेख व बोर्डे यांनी तक्रारदाराकडून ५ हजाराच्या लाचेची मागणी केली. संबंधितांने लाच देण्याची इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार केली. बुधवारी सकाळी नारेगाव पोलीस चौकी येथे दोघांनी रोख ५ हजाराची लाच घेतली. सापळा लावून बसलेल्या लाच लुचपत पथकानी दोघांनाही ताब्यात घेतले.

पोलीस निरीक्षक विकास घनवट तसेच मिलिंद इप्पर, संतोष जोशी, चालक देविसिंग ठाकूर यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Two constables arrested for taking bribe for not attending police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.