दोन जिवलग मित्रांची छत्रपती संभाजीनगरमध्ये आत्महत्या, रेल्वेरुळावर दिला जीव

By सुमित डोळे | Published: July 18, 2023 11:02 AM2023-07-18T11:02:57+5:302023-07-18T11:10:23+5:30

आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आले नाही. 

Two close friends committed suicide in Chhatrapati Sambhajinagar, died on railway track at Mukundwadi railwaystation | दोन जिवलग मित्रांची छत्रपती संभाजीनगरमध्ये आत्महत्या, रेल्वेरुळावर दिला जीव

दोन जिवलग मित्रांची छत्रपती संभाजीनगरमध्ये आत्महत्या, रेल्वेरुळावर दिला जीव

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर: दोन जिवलग मित्रांनी रेल्वेरुळावर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज पहाटे मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर उघडकीस आली. दोघेही मजुरी काम करत असल्याची माहिती आहे. त्यांच्या आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आले नाही. विशाल देविदास दाभाडे ( 20 वर्ष रा. विश्रांती नगर गल्ली नंबर 04 छत्रपती संभाजीनगर ) आणि अनिल दादाराव आव्हाड ( 30 वर्ष रा. भारत नगर छत्रपती संभाजीनगर ) असे मृतांची नावे आहेत.

सकाळी स्थानिक कामावर निघालेले असताना रुळावर छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळले. त्यांनी तत्काळ पोलिसांना ही बाब कळवली . घटना समजताच डायल ११२ तसेच पुंडलिकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. काही स्थानिकांनी ते मृतदेह विशाल, अनिलचे असल्याचे  सांगितले. यावरून पोलिसांनी त्यांच्या कुटुंबाला संपर्क केला.

घाटी रुग्णालयात दोघांच्या नातेवाईकांनी मृतदेह पाहून तेच असल्याचे स्पष्ट केले. माहिती मिळताच नातेवाईक आणि मित्रांनी घाटी रुग्णालयात गर्दी केली. दरम्यान, दोघेही मित्र मजूर काम करत असत. रात्री बराच वेळ सोबत वेळ घालवला असल्याची माहिती काहींनी दिली. मात्र, त्यानंतर अचानक दोघांनी एकाचवेळी जीवन संपवल्याने या मागे काय कारण असावे याबाबत पोलीसांचा तपास सुरु आहे. 

अधिक तपास सुरु आहे 
दोघांचे मृतदेह रुळावर आढळून आले आहे. रात्रीतून हा प्रकार घडला. प्रथमदर्शनी ही आत्महत्या आहे. अधिक तपास सुरू असल्याचे पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे यांनी सांगितले.

Web Title: Two close friends committed suicide in Chhatrapati Sambhajinagar, died on railway track at Mukundwadi railwaystation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.