खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात ट्रकने दुचाकीला उडवले; दोघे जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 12:56 IST2019-12-11T12:53:52+5:302019-12-11T12:56:54+5:30
माळीवाडा - शरणापूर रस्त्यादरम्यान खड्ड्यांचे प्रमाण अधिक

खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात ट्रकने दुचाकीला उडवले; दोघे जागीच ठार
औरंगाबाद : ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघेजण ठार झाल्याची घटना माळीवाडाजवळ मंगळवारी रात्री १२ वाजेच्या दरम्यान घडली. सुरेश लक्ष्मण उबाळे ( २३ ) व अर्जुन तुळशीराम माळी (३०, दोघे राहणार शहापूर बंजर, गंगापूर) अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात ट्रक अनियंत्रित झाल्याने दुचाकीला धडकला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सुरेश व लक्ष्मण हे दोघे सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास फतीयाबाद येथे कामानिमित्त गेले होते. रात्री १२ वाजेच्या दरम्यान दोघेही दुचाकी ( क्रमांक MH20 CM 9079 ) वरून औरंगाबादकडे येत होते. माळीवाडा जवळ एका ट्रकने (क्र MP 17HH 2533 ) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच दौलताबाद पोलिस स्थानकाचे सहायक उपनिरीक्षक व्ही एस शिंद, यू आर निकम, बी एस पगारे, के एल घुसळे यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना घाटी रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. पुढील तपास उपनिरीक्षक रवी कदम व पोपट दहिफळे हे करत आहेत.