शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबारप्रकरणी २ आरोपी अटकेत

By admin | Updated: June 28, 2014 01:20 IST

वाळूज महानगर : पंढरपुरात दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोन्ही गटांतील वाद मिटविण्यासाठी मध्यस्ती करणाऱ्या युवकावर गोळीबार केल्याप्रकरणी

वाळूज महानगर : पंढरपुरात दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोन्ही गटांतील वाद मिटविण्यासाठी मध्यस्ती करणाऱ्या युवकावर गोळीबार केल्याप्रकरणी आज सचिन पोपट राऊत व बबन रंगनाथ साबळे (दोघेही रा. वळदगाव) या आरोपींना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात सहभागी ८ आरोपी फरार असून त्यांचा शोध एमआयडीसी वाळूज पोलीस घेत आहेत.काल २६ जूनला भांडण मिटविण्यासाठी गेलेल्या शेख निसार शेख शब्बीर (२८, रा. फुलेनगर, पंढरपूर) यांच्या पोटात गोळी झाडून तसेच हवेत गोळीबार करून आरोपी फरार झाले होते. या गोळीबाराच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या शेख निसार यांस उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शेख निसार याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या गोळीबारप्रकरणी शेख तालेब याच्या फिर्यादीवरून आरोपी अण्णा मनोहर साबळे, ज्ञानेश्वर काशीनाथ साबळे, बबन रंगनाथ साबळे, सचिन पोपट राऊत, नामदेव शिंदे, पमू दगडू बुट्टे, विलू बाबासाहेब झळके (सर्व रा. वळदगाव, ता.जि. औरंगाबाद), तसेच गोळीबार करणारा अनोळखी युवक व त्यांच्या दोघा साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरोपी लपले वळदगावातया गोळीबारप्रकरणी पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी धरपकड मोहीम राबविली होती. मारहाण करणारे आरोपी वळदगावात लपून बसल्याची माहिती मिळताच आज २७ जूनला सकाळी पोलिसांनी छापा मारून आरोपी सचिन पोपट राऊत व बबन रंगनाथ साबळे (दोघेही रा. वळदगाव) यांना अटक केली आहे. उर्वरित ८ आरोपींचा शोध एमआयडीसी वाळूज पोलिसांकडून सुरू आहे.