शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीत बसले ३,७०० अश्वशक्तीचे दोन पंप; दिवाळीनंतर २०० एमएलडी वाढीव पाणी मिळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 19:15 IST

एक पंप २८ टन वजनाचा, उंची २२ मीटर; पंप ज्याठिकाणी बसवायचा त्या ठिकाणपर्यंत नेण्यासाठी क्रेन आणण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबरपासून शहराला दररोज पाणी द्या, अशी सूचना केली होती. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नवीन पाणीपुरवठा योजनेला चांगलीच गती दिली. जायकवाडीत मागील १३ दिवसांपासून पाणी उपसा करणारे ३ हजार ७०० अश्वशक्तीचे दोन मोठे पंप बसविण्याचे काम सुरू होते. गुरुवारी सायंकाळी हे दोन्ही पंप यशस्वीरीत्या बसविण्यात यश आले. नियोजित वेळापत्रकानुसार सर्व कामे पूर्ण झाल्यास दिवाळीनंतरच शहराला वाढीव २०० एमएलडी पाणी मिळू शकते.

सध्या शहराला २६ एमएलडी वाढीव पाणी मिळत आहे. जलपूजनासाठी दोन आठवड्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फारोळा येथे आले होते. त्यांनी नवीन पाणीपुरवठा योजनेचा पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत पूर्ण करा, असे निर्देश दिले होते. त्यानंतर पाणीपुरवठा योजनेच्या कामाने चांगलीच गती घेतली आहे. जायकवाडी धरणातून दररोज २०० एमएलडी पाणी उपसण्यासाठी ३,७०० अश्वशक्तीचे दोन पंप बसवण्याचे काम गुरुवारी पूर्ण झाले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी सांगितले की, धरण पूर्णपणे भरलेले आहे. त्यात दोन पंप बसविण्याचे काम सुरू करण्यात आले.

योजनेतील सर्वांत मोठे काम१) एका पंपाचे वजन २८ टन आहे. पंप ज्याठिकाणी बसवायचा त्या ठिकाणपर्यंत नेण्यासाठी क्रेन आणण्यात आली. एका पंपाची उंची २२ मीटर आहे. या पंपांवर आता स्लॅब टाकण्यात येणार आहे.२) १५ ऑक्टोबरपर्यंत मोटार बसवण्याचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल, असेही मजीप्रा अधिकाऱ्यांनी नमूद केले. दिवाळीच्या सुमारास किंवा नंतर २०० एमएलडी पाण्याची चाचणी सुरू करण्याचा प्रयत्न असेल.३) जायकवाडीत ३,७०० अश्वशक्तीचे दोन पंप बसवण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनीदेखील दिली. निर्धारित वेळेत काम होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाJayakwadi Damजायकवाडी धरण