शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

'दोन वेळा कुलगुरू आणि त्यादरम्यान विद्यार्थीही'; जाणून घ्या भुजंगराव कुलकर्णी आणि विद्यापीठाचे नाते, त्यांच्याच शब्दात

By सुमेध उघडे | Published: February 24, 2021 4:44 PM

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university "महाराष्ट्र व्हायचा होता. औरंगाबाद हैदराबाद स्टेटचा भाग होतं. 1958 ला औरंगाबादला विद्यापीठ सुरू झालं. तेव्हा हा आजचा परिसर वगैरे नव्हता. इमारती नव्हत्या. मी त्यावेळी कलेक्टर होतो.

औरंगाबाद : निवृत्त सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांचे बुधवारी निधन झाले. मराठवाड्याच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे.  त्यांच्या काळातच औरंगाबाद इथे विद्यापीठाच्या स्थापनेला मान्यता मिळाली. तेव्हाच्या मराठवाडा विद्यापीठाच्या आणि आता महामानवाचे नाव ल्यालेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जन्मकाळातील काही हकीकत भुजंगरावांच्याच शब्दांत...  

"महाराष्ट्र व्हायचा होता. औरंगाबाद हैदराबाद स्टेटचा भाग होतं. 1958 ला औरंगाबादला विद्यापीठ सुरू झालं. तेव्हा हा आजचा परिसर वगैरे नव्हता. इमारती नव्हत्या. मी त्यावेळी कलेक्टर होतो. एक दिवस सकाळी सकाळी कुलगुरू डोंगरकेरी माझ्या दारात उभे राहिले. मला घर द्या, म्हणाले. मग आम्ही त्यांची राहायची व्यवस्था केली. विद्यापीठासाठी जागेचा प्रश्न होता. आज जिथे जिल्हा परिषद् आहे, तिथे प्रायमरी स्कूल होतं. त्याला 'फोकानिया' म्हणत. तिथला पसारा हटवुन जागा करून दिली. काही दिवसांनी पंतप्रधान पंडितजी येणार होते. त्या कार्यक्रमाचं सगळं नियोजन आम्ही केलं. तिथेच इमारतीच्या मागच्या बाजूला विद्यापीठाच्या उभारणीची कोनशिला त्यांच्या हस्ते बसवली. 

काही दिवसांनी मुख्यमंत्री यशवंतराव औरंगाबादला आले. बोलता बोलता त्यांनी विषय काढला, 'विद्यापीठाला जागा पाहताय म्हणे...' मी हो म्हणालो. त्यांनी लगेच ती जागा पाहता येईल का, असं विचारलं. पाहता येईल, पण जीपनं जावं लागेल, असं मी त्यांना सांगितलं. त्या काळात आजच्यासारखे सगळीकडे रस्ते झालेले नव्हते. मोटार जाऊ शकत नव्हती. पण यशवंतराव लगेच तयार झाले. मग काही अंतरापर्यंत मोटार आणि मग जीपमधून आम्ही जागेवर गेलो. त्यांना जागा आवडली. विशेषतः डोंगराने वेढलेला परिसर त्यांनी लांबुन पाहिला. आवडला त्यांना. 

सहसा कलेक्टर मुख्यमंत्र्याला फार बोलायचं धाडस करत नाही. पण मी त्यांना म्हणालो, जेमतेम पाच-सहा कॉलेजसाठी तुम्ही विद्यापीठ दिलंय. आता याचे जनक म्हणून तुम्हाला विद्यापीठाचे पिता म्हणू, की आता ममत्व दाखवताय, पुढे पालनही करणार आहात म्हणून विद्यापीठाची माता म्हणू? माणसाचं मोठेपण कसं दिसून येतं बघा, यशवंतराव हसून म्हणाले, 'कुलकर्णी, मला फक्त विद्यापीठाचा मित्र म्हणा.' पुढे जागा झाली. इमारती झाल्या. साठ साली मीही बदलून गेलो. 

मी तसा उस्मानिया विद्यापीठाचा ग्रॅज्युएट. तेव्हा मराठवाड्यात एकही सीनियर कॉलेज नव्हतं. एक इंटरमिजिएट कॉलेज फक्त होतं. उस्मानियाचे कुलगुरु राहिलेले नवाब अलियावरजंग महाराष्ट्राचे राज्यपाल झाले. विद्यापीठाच्या उभारणीकडे त्यांचं लक्ष होतं. त्यांनी माझ्यात असं काय पाहिलं कोण जाणे, पण ते म्हणत, की तुम्हाला या विद्यापीठाचं कुलगुरु करायचंय. मी नकार द्यायचो. एकदा ते इथं आले होते. सेक्रेटरी त्यांना भेटायला जायचे होते. तेव्हा माझी नेमणूक मराठवाडा विकास महामंडळावर होती. ती संधी दिल्याबद्दल मला त्यांचे आभार मानायचे होतेच. सेक्रेटरींबरोबर मीही गेलो. तेव्हा त्यांनी पुन्हा कुलगुरूपदाचा विषय काढला. पण मला विकास, आर्थिक नियोजन याच विषयात काम करायचं असल्याचं मी सांगितलं. पण तेव्हा कुलगुरुपद रिक्त झालं होतं. गव्हर्नर अलियावरजंग आजारी होते. त्याच आजारपणात पुढे ते वारले. वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. त्यांना दवाखान्यात पलंगावर पडल्या पडल्याच त्यांनी पुन्हा मला कुलगुरु करण्याचा विषय काढला. पण मी अनुत्सुक असल्याचं वसंतरावांनी त्यांना सांगितलं. त्यावर ते म्हणाले, असं. कुलकर्णी नाहीच म्हणतात? मग आपण त्यांना कुलगुरु निवडणाऱ्या समितीचा अध्यक्ष करू. अशा रितीनं मी त्या समितीचा अध्यक्ष झालो. आज इथं असलेले न्यायमूर्ती देशमुख त्या समितीचे सदस्य होते. 

पण कालांतराने निवृत्त झालो आणि त्यानंतरच्या दहा वर्षांच्या काळात दोन वेळा या विद्यापीठाचा कुलगुरू होण्याची संधी मला मिळाली. मध्यंतरीच्या काळात मी अकैडमिक कौंसिल, मॅनेजमेंट कौंसिलचा मेंबर वगैरेही होतोच. पण साठीत निवृत्त झालो तेव्हा मी अर्थशास्त्रातून पीएच डीसाठी अर्ज केला होता. तेव्हाचे विभागप्रमुख माझे गाईड होते. 'मराठवाड्याचे आर्थिक नियोजन आणि विकास' हा विषय. पण जेमतेम वर्षभरात बोरीकरांचे निधन झाले. पण विद्यापीठानं मला विनागाईड पीएचडीचे काम सुरु ठेवायची परवानगी दिली. 

याच 10 वर्षांच्या काळात मी दोन वेळा कुलगुरु झालो. एकाच काळात मी विद्यापीठाचा विद्यार्थीही होतो आणि कुलगुरुही होतो. अभ्यासही करत होतो. प्रबंध पूर्ण झाला. पण मी तो विद्यापीठाला सादर केला नाही. मीच कुलगुरु असल्यामुळे त्या प्रबंधाचे मूल्यांकन करताना परीक्षक भिडेखातर पार्श्यलिटी करतील. कठोर परीक्षण होणार नाही, असे मला वाटले. म्हणून मी तो प्रबंध तसाच ठेवला. त्याचा ग्रंथ प्रकाशित केला. 

तर अशा या माझ्या आठवणी आहेत. विद्यापीठाला आणखी जागतिक पातळीवर नेण्याचे स्वप्न असल्याचे आता कुलगुरूंनी म्हटले. त्यासाठी मी सदिच्छा व्यक्त करतो. मला बोलावलंत, सत्कार केलात, त्याबद्दल आभार मानतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छांसह माझे दोन शब्द संपवतो. 

( डॉ. बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठाने भुजंगराव कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. तेव्हा त्यांनी केलेल्या भाषणाचा अंश. संदर्भ - सोशल मिडिया - संकेत कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट  ) 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रMarathwadaमराठवाडा