शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी परिस्थितीत दुग्ध व्यवसाय अडचणीत

By admin | Updated: August 25, 2014 23:48 IST

गढी : पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटत आला तरी अद्यापही अपेक्षेप्रमाणे वरूण राजाने हजेरी लावलेली नाही.

गढी : पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटत आला तरी अद्यापही अपेक्षेप्रमाणे वरूण राजाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे हिरवा चारा मिळणे अशक्य झाले आहे. त्याचा परिणाम दुग्ध व्यवसायावर होत असल्याचे चित्र गढी परिसरात दिसून येत आहे. या वर्षी जिल्ह्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नाही. गढी परिसरातही या वर्षी पावसाने दडी मारली. पाऊस नसल्यामुळे हिरवा चारा उपलब्ध झाला नाही. शेतीच्या कडेला असलेल्या बांधावरही अद्याप वाळलेलेच गवत आहे. प्रत्येक वर्षी या दरम्यान प्रत्येक बांधावर हिरवा चारा दिसून येत असतो. मात्र यावर्षी असा कुठलाही प्रभाव दिसून आला नाही. हिरवा चारा मिळत नसल्याने शेतकरी आपल्याकडे असलेल्या गायी, म्हशी, शेळी आदी पशुधन बाजारात विक्रीसाठी घेऊन जात आहेत. दुग्ध व्यवसाय करण्याकडे अगोदरच शेतकऱ्यांचा कमी कल आहे. शासनाकडून दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी या व्यवसायाकडे पाठ फिरवू लागला आहे. गढी परिसरात पूर्वी मोठ्या संख्येने दुग्ध व्यवसाय केला जात होता. त्यावेळेस जनावरांसाठी हिरवा चाराही उपलब्ध होता व योग्य हमी भावही मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती बरोबरच दुधाचा व्यवसाय जोडला होता. बाजारामध्ये येणाऱ्या हिरव्या चाऱ्याचे भावही गगणाला भिडले आहे. मका, गवत, घास आदी प्रकारचा चारा महागला आहे. मक्याची एक पेंडी वीस ते तीस रुपयांना घ्यावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी आपले पशुधन बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. या वर्षी शासनाकडूनही दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय करणे सोडून दिले आहे. त्यातच पावसानेही दडी मारली आहे. पाऊस कमी झाल्याने हिरव्या चाऱ्याची भासते टंचाई.४शासनाकडूनही मिळत नाही दुधाला योग्य भाव. ४हिरव्या चाऱ्याचे भाव कडाडले आहेत.४शेतकऱ्यांनी गाय, म्हैस, शेळी हे पशुधन विक्रीसाठी आणले बाजारात. ४हिरवा चारा उपलब्ध करून देण्याची होतेय मागणी.४दुग्ध व्यवसाय करणारे आले अडचणीत.४शेतकरी करू लागला पावसाची प्रतीक्षा.