शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक उलटला; संत्र्यांचे नुकसान

By admin | Updated: March 27, 2016 23:50 IST

साटंबा : हिंगोली तालुक्यातील साटंबा- हिंगोली रस्त्यावर संत्र्याने (५२० कॅरेट) भरलेला ट्रक २६ मार्चच्या रात्री ९ वाजता उलटल्याने शेतकरी भगवान दाजिबा घ्यार यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

साटंबा : हिंगोली तालुक्यातील साटंबा- हिंगोली रस्त्यावर संत्र्याने (५२० कॅरेट) भरलेला ट्रक २६ मार्चच्या रात्री ९ वाजता उलटल्याने शेतकरी भगवान दाजिबा घ्यार यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.यावर्षी अत्यल्प पावसामुळे संत्र्याचे झाडे जगविणेही अवघड झाले होते. भगवान घ्यार या शेतकऱ्याने नवीन बोअर घेवून या झाडाला पाणी दिले. त्यानंतर कसाबसा मळा बागवानाला विक्री केला; परंतु नुकत्याच झालेल्या वादळीवारे आणि पावसामुळे संत्र्यांची पडझड झाली. त्यामुळे बागवानानेही परिसरातील मळे सोडून दिले. या शेतकऱ्यांने स्वत: विकण्याचा बेत केला; परंतु साटंबा ते हिंगोली पारोळा मार्गे संत्र्याचा भरलेला ट्रक भांडेगावजवळ वळण रस्त्यावर पलटी झाला. यामध्ये या शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले. साटंबा ते हिंगोली या रस्त्यावरील कित्येक वर्षापासून साधे खड्डेही बुजविले नाहीत, परिसरातील राजकारणी आणि कंत्राटदार एकच असल्यामुळे या परिसरातील गावचा रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या नावाखाली बजेट उचलले जाते. कित्येक वेळेस खड्ड्यांची डागडुजी झाली तर ती दोन महिन्यामध्ये जैसे थे होत होते. त्यामुळे वाहनधारकांना या रस्त्यावर वाहन चालविणे अवघड झाले आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे झाल्याने असे अनेकदा अपघात होतात. याकडे कोणाचेही लक्ष जात नाही, हे विशेष. भांडेगाव ते पारोळा या रस्त्यावरील वळण रस्त्यावर अनेक वेळा अपघात होवून कित्येक ट्रक, जीप, आॅटो उलटून प्रवाशांना दुखापत झाली आहे. या रस्त्यामध्येच मोठमोठे खड्डेही पडले आहेत. त्यामुळे वाहनाचा तोल सांभाळणे शक्य नसल्याने अपघात होत आहेत, असे चालक सांगतात. (वार्ताहर)