शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी गावांमध्ये सामाजिक पोळा साजरा

By admin | Updated: August 26, 2014 23:56 IST

कळमनुरी : तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

कळमनुरी : तालुक्यातील आदिवासी बहुल असलेल्या खापरखेडा, तरोडा, बिबगव्हाण या गावांमध्ये पोळ्यानिमित्त गरीब शेतकऱ्यांना बैलजोड्यांसाठी साजश्रृंगाराचे वाटप करून दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. पोळ्याच्या सणाला कृषी संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांची मनोभावे पूजा करून त्याची सेवा करण्याचा हा दिवस असतो. परंतू यंदा दुष्काळी स्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. मागील वर्षी झालेल्या गारपिटीच्या तडाख्यातून सावरत असतानाच शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. दुबार-तिबार पेरणी करूनही पिके येण्याची आशा मावळल्याने आधीच कर्जाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना यंदा पोळा सण साजरा करता येईल की नाही अशी स्थिती होती. ही बाब ध्यानात घेऊन कळमनुरी तालुक्यातील खापरखेडा, तरोडा, बिबगव्हाण या गावांमधील आदिवासी शेतकऱ्यांना सणासाठी मदत करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळालेले घोळवा येथील अजित मगर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम घेण्यात आला. तरोडा येथे शेतकऱ्यांना बैलजोडी सजविण्यासाठी लागणाऱ्या झुली, बेगड व इतर श्रृंगाराचे साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास अजित मगर, बळीराम नाईक, भावराव सरकुंडे, संतोष वाळले, नारायण माहोरे, देवीदास खंदारे, नीळकंठ मस्के, भीकाराव चवरे, मधुकर खंदारे, दीपक ठाकरे, भिकाजी माहोरे, संभाजी खंदारे, शामराव ससाने, भीमराव मस्के, राहुल चवरे आदी उपस्थित होते. खापरखेडा येथेही हा उपक्रम घेण्यात आला. याप्रसंगी बालाजी चिभडे, हरिदास असोले, देवजी आसोले हजर होते. बिबगव्हाण येथील शिवाजी फोपसे, बालासाहेब नाईक, सदाशिव बोरकर,बालासाहेब पोले, किशन मापारे, गंगाधर वंजारे, रघुनाथ सोवितकर, अशोक जावळे, दामाजी फोपसे, बाबाराव सातपुते, केशवराव बोडखे, सरपंच दत्तराव बेले, साहेबराव पोटफाडे, रामजी गुहाडे, उत्तम खरवडे, उत्तम पोटे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)