औरंगाबाद येथील सिडकोच्या उड्डाणपुलावरून नाक दाबून प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 12:44 IST2018-11-19T12:43:36+5:302018-11-19T12:44:43+5:30
पर्यटन राजधानी असलेल्या शहराच्या प्रवेश द्वारावर असलेल्या सिडको उड्डाणपुलावर दोन दिवसांपासून श्वानाचा मृतदेह पडून आहे.

औरंगाबाद येथील सिडकोच्या उड्डाणपुलावरून नाक दाबून प्रवास
औरंगाबाद : पर्यटन राजधानी असलेल्या शहराच्या प्रवेश द्वारावर असलेल्या सिडको उड्डाणपुलावर दोन दिवसांपासून श्वानाचा मृतदेह पडून आहे. यामुळे या मार्गावरून वाहतूक करणाऱ्यांना नाक दाबून प्रवास करावा लागत आहे.
शहर फेब्रुवारीपासून कचरा समस्येशी झगडत आहे. यातच कचरा निवारणाचे अनेक दावे महापौर, मनपा आयुक्त यांनी केले आहेत. मात्र मागील दोन दिवसांपासून सिडकोच्या उड्डाणपुलावर अपघातात मृत झालेल्या श्वानाचा मृतदेह अद्यापही पडून आहे. यामुळे या मार्गावर वाहनचालकांना प्रचंड दुर्गंधीत नाक दाबून प्रवास करावा लागत आहे.
पर्यटन राजधानी असलेल्या शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या या उड्डाणपुलावरचे हे दृश्य म्हणजे शहराची प्रतिमा मलीन करणारे असल्याची भावना वाहनधारकांनी व्यक्त केली आहे.