शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

देगलुरात अतिक्रमणावर ‘जेसीबी’चा उतारा

By admin | Updated: December 18, 2015 00:01 IST

देगलूर : राजकीय पाठबळाच्या आधारावर देगलुरातील रस्त्यांवर अतिक्रमण करणारे विविध भागातील शेकडो व्यावसायिक शेड उद्धवस्त करीत पालिका प्रशासनाने स्वच्छता मोहीम हाती घेतली़

देगलूर : राजकीय पाठबळाच्या आधारावर देगलुरातील रस्त्यांवर अतिक्रमण करणारे विविध भागातील शेकडो व्यावसायिक शेड उद्धवस्त करीत पालिका प्रशासनाने स्वच्छता मोहीम हाती घेतली़ मोठ्या पोलिस बंदोबस्तात १७ डिसेंबर रोजी पहाटे सुमारास या कारवाईस सुरुवात करण्यात आली़ मुख्याधिकारी रामदास पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत स्वामी, प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक सचिन बारी, पोलिस निरीक्षक शरद उगले हे या कारवाईदरम्यान उपस्थित होते़ अतिक्रमणाबरोबरच अनेक वर्षांपासून भाडेतत्वावर देण्यात आलेल्या जागा देखील मोकळ्या करण्यात आल्या़ भाडेतत्वावरील जागांचे नूतनीकरण न करणे, त्या अन्य व्यावसायिकास जबर भाड्याने देणे, अथवा अशा जागा हस्तांतरीत करून त्या सौद्यातून लाखो रुपयांची कमाई करणे असे अनेक गैरप्रकार समोर आल्याने भाडेतत्वावरील सर्व जागा मोकळ्या करण्यात आल्याचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सांगितले़ पोलिस ठाण्याच्या संरक्षक भिंतीलगत फुटपाथवर उभारलेल्या पब्लिक नोटरी कार्यालयास प्रथम लक्ष्य करण्यात आल्यानंतर सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालय, टपाल कार्यालय परिसराकडे मोर्चा वळवण्यात आला़ या ठिकाणी प्रारंभी विरोध करीत दगडफेक करण्यात आल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती़ परंतु काही काळातच हा भाग अतिक्रमणापासून मुक्त करण्यात आला़ त्यानंतर दिवसभरात लोहीया मैदान, भाजी मंडई, गळगल्ली, जुना सराफा, जिल्हा परिषद (मुलांची) प्रशाळा, पिरोजदीन टॉकीज परिसर, नगर परिषद प्रशाळा परिसर, जिल्हा परिषद शहाजीनगर प्रशाळेचे प्रांगण, जुने बसस्थानक या ठिकाणी बेकायदेशीरपणे उभारलेले गाळे, टपऱ्या काढून रस्त्यांना पूर्व परिस्थितीवर आणले़ दरम्यान, उद्या दि.१९ डिसेंबर रोजीही अतिक्रमण विरोधात मोहिम राबविण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. (वार्ताहर)