शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
3
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
4
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
5
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
6
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
7
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
8
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
9
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
10
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
11
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
12
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
13
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
14
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
15
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
16
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
17
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
18
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
19
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षणापासून आरेखक वंचितच !

By admin | Updated: July 25, 2014 00:28 IST

संजय तिपाले , बीड अनुरेखक पद गोठविल्यानंतर आरेखकवर्गीय कर्मचाऱ्यांकडे शासनाचे कमालीचे दुर्लक्ष झाले. बदलत्या काळानुरुप त्यांना प्रशिक्षण, अद्ययावत साहित्य देखील उपलब्ध करुन दिले नाही.

संजय तिपाले , बीडअनुरेखक पद गोठविल्यानंतर आरेखकवर्गीय कर्मचाऱ्यांकडे शासनाचे कमालीचे दुर्लक्ष झाले. बदलत्या काळानुरुप त्यांना प्रशिक्षण, अद्ययावत साहित्य देखील उपलब्ध करुन दिले नाही. त्यामुळे आरेखकांच्या कुशलतेला वावच मिळाला नाही, अशी माहिती समोर आली आहे.अनुरेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांचा स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या संवर्गात समावेश करण्याचा शासानादेश आला; पण बीडमध्ये अजूनही काही कर्मचारी अनुरेखक पदावरच कार्यरत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील पदे रिक्त नसल्याने त्यांचा या संवर्गातील समावेश रखडला आहे. दरम्यान, अनुरेखक पद गोठल्यानंतर आरेखक व कनिष्ठ आरेखक यांना बदलत्या काळानुसार तांत्रिक प्रशिक्षण देणे गरजेचे होते. शिवाय त्यांना अद्यावत उपकरणेही उपलब्ध करणे आवश्यक होते.शासनाने त्यांना प्रशिक्षण तर दूरच; पण उपकरणे देखील दिली नाहीत. उपकरणांसाठी शासनाकडे पत्रव्यवहार करुनही प्रतिसाद मिळत नसल्याने तोकड्या साहित्यावरच कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. त्यामुळे आरेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला असून त्यांना त्यांची कुशलता व क्षमता विकसित करण्याची संधीच मिळाली नाही.कामाचा बोजा !आरेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांना ‘जॉबचार्ट’ प्रमाणे ३१ प्रकारची कामे करावी लागतात. नकाशाचा पुरवठा, गोपनीय पत्रव्यवहार, वार्षिक अहवाल, रस्त्यांची नोंद निर्देशिका, पुलांची नोंद निर्देशिका, इमारतींची नोंद निर्देशिका, तपासणी टिपणी, रस्त्यांचे स्थानदर्शक नकाशे, नकाशे अद्यावत करणे, खडीचे दरपत्रक ठेवणे, मान्सूनपूर्व तसेच मान्सूननंतर तपासणी बांधकाम नोंदी निर्देशिका अद्यावत ठेवणे, रोडचार्ट अ, ब अद्यावत करणे आदी कामांचा समावेश आहे. याशिवाय पंचायत समिती स्तरावर इतर कामेही आरेखकांवर ढकलली जातात. त्यामुळे मूळ कामे प्रलंबित राहतात.प्रशिक्षण महत्त्वाचेराज्य जिल्हा परिषद रेखाचित्र संवर्ग कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष सय्यद एम. एल. यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, आरेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांना यशदाकडून अद्ययावत तांत्रिक प्रशिक्षणाची नितांत गरज आहे. संगणक अर्हता, संगणक पुरवठा, उपकरणे उपलब्ध नाहीत. त्यामुळे कामकाजात अडचणी येतात. कामात अचूकता व गती आणण्यासाठी कर्मचारी प्रशिक्षित हवेत असे सांगून आरेखकांना जॉबकार्डप्रमाणेच कामे द्यावीत, इतर कामांचा बोजा नको असेही सय्यद म्हणाले.