छत्रपती संभाजीनगरजवळ रेल्वेची दुर्घटना टळली; रुळावर दगड ठेवून घातपाताचा प्रयत्न उघड
By संतोष हिरेमठ | Updated: September 23, 2024 13:52 IST2024-09-23T13:51:29+5:302024-09-23T13:52:37+5:30
चिकलठाणा ते करमाडदरम्यान रेल्वे रुळावर दगड ठेवल्याची घटना समोर आली आहे.

छत्रपती संभाजीनगरजवळ रेल्वेची दुर्घटना टळली; रुळावर दगड ठेवून घातपाताचा प्रयत्न उघड
छत्रपती संभाजीनगर : देशभरात रेल्वे रुळावर लोखंडी रॉड, दगड ठेवून घातपात करण्याचा प्रयत्न समोर आल्याने चिंता व्यक्त होत आहे . अशीच घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. चिकलठाणा ते करमाडदरम्यान रेल्वे रुळावर दगड ठेवल्याची घटना समोर आली आहे.
चिकलठाणा ते करमाड दरम्यान दगड ठेवल्याने रेल्वेच्या वाहतुकीत अडथळा आल्याची घटना रविवारी रात्री घडली. या प्रकाराची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बल , रेल्वे अधिकारी ,कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अडथळा बाजूला केला आणि रेल्वे वाहतूक सुरळीत केली अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, घटनास्थळावरील रुळावर सिमेंट ब्लॉकचा भुगा आढळून आला आहे. वेळीच अडथळ्याची माहिती मिळाल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेची रेल्वेने गंभीर दखल घेतली असून गुन्हा दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.