आधीच एकेरी रस्ता, त्यात वाहतूक जाम; जळगाव महामार्गावर फुलंब्रीजवळ शेकडो वाहने अडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 18:56 IST2024-01-17T18:52:59+5:302024-01-17T18:56:13+5:30

तब्बल तासाभरपासून दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प असल्याने शेकडो वाहने अडकून पडली आहेत.

Traffic jam near fulunbri on Chhatrapati Sambhajinagar to Jalgaon highway; Hundreds of vehicles were stuck | आधीच एकेरी रस्ता, त्यात वाहतूक जाम; जळगाव महामार्गावर फुलंब्रीजवळ शेकडो वाहने अडकली

आधीच एकेरी रस्ता, त्यात वाहतूक जाम; जळगाव महामार्गावर फुलंब्रीजवळ शेकडो वाहने अडकली

- रऊफ शेख 
फुलंब्री :
छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गावर फुलंब्रीजवळ बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून वाहतूक जाम झाली आहे. तब्बल एक तासापासून शेकडो वाहने एकाच जागेवर असल्याने वाहतूकधारक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, वाहतूक सुरळीत करण्यासाठी एकही पोलिस येथे नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. 

फुलंब्रीपासून ३ किमी अंतरावर छत्रपती संभाजीनगर - जळगाव या राष्ट्रीय महामार्गावर माठ पाटीनजीक रस्त्याचे एका बाजूने काम सुरू आहे. याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला भाजीपाला विक्रेते  बसलेले आहेत. आधीच एकेरी वाहतूक त्यात रस्त्यावरच भाजीपाला विक्रेते यामुळे आज सायंकाळी साडेपाच पासून येथे वाहतूक जाम झाली आहे. तब्बल तासाभरपासून दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प असल्याने शेकडो वाहने अडकून पडली आहेत.

Web Title: Traffic jam near fulunbri on Chhatrapati Sambhajinagar to Jalgaon highway; Hundreds of vehicles were stuck