शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

कुंभारवाड्यातील पारंपरिक पणत्यांना आधुनिकतेचा साज

By admin | Updated: October 14, 2014 00:34 IST

विनोद नरसाळे ल्ल कोळगाव अनेक वर्षांपासून पारंपारीक पद्धतीने बनविल्या जाणाऱ्या पणत्यांना यंदा आधुनिकतेचा साज देण्यात आला असल्याने

विनोद नरसाळे ल्ल कोळगावअनेक वर्षांपासून पारंपारीक पद्धतीने बनविल्या जाणाऱ्या पणत्यांना यंदा आधुनिकतेचा साज देण्यात आला असल्याने या पणत्या सर्वांच्या आर्कषणाचा विषय ठरतो आहे. मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी भाव वाढले असल्याने पणत्यावरही महागाईचा काळोख परसला आहे.दिवाळी म्हटल की, प्रकाशाचा सण, दिव्यांचा उत्सव. गावा-गावातील कुंभार वाड्यात पणत्या बनविण्यास वेग आला आहे. बाजारामध्ये दर वर्षी वेगवेगळ्या पद्धतीच्या पणत्या विक्रीस येत असल्याने पारंपारीक पणत्यांची मागणी घटली होती मात्र जमान्या सोबत चलायचे असेल तर बदल आवश्यक असल्याची बाब लक्षात आल्याने पणत्यांचा पारंपारीक साज बदल्यास यंदा प्राधान्य दिले गेले आहे. पणत्यांना विविध रंगानी रंगविले जात असल्याने बाजारात या पणत्या सर्वांचे लक्ष वेधुन घेत आहेत. लाल मातीपासून बनविलेल्या या पणत्यांना परदेशी पणत्यांप्रमाणे रंग देण्यात येत आहे. फायबर, प्लास्टिक, इलेक्ट्रानिक, चायनीज प्रकारच्या पणत्यांच्या तुलनेत बनविण्चा प्रयत्न केला जात आहे. पुर्वी मातीच्या पणत्यांचा वापर केला जायचा मात्र अलीकडच्या काळात चायनिज पणत्यांची चलती आहे. त्यामुळे पारंपारीक पद्धतीच्या पणत्यांना नव्याने बाजारात उतरविले जात आहे. हिंदु परंपरेनसार संस्कृतीची जपवणूक करुनच प्रत्येक सण साजरे केला जातात. आधुनिक काळात सर्वच स्तरावर बदल होत चालले आहेत त्यामुळे नियमीत वापरांच्या वस्तु व मागणीत बदल होत चालले असल्याचे दिसून येत आहे. दिवाळी बाजारपेठेत जवळपास चायनिज वस्तुंचा शिरकाव झाला आहे. विशेष म्हणजे, त्या वस्तु स्वस्त असल्याने त्यास प्राधान्य दिले जाते. परिणामी पारंपारीक वस्तु विक्रीवर परिणाम होत चालला आहे. त्याला उत्तर म्हणून पारंपारीक वस्तु आता आकर्षक स्वरुपात ग्रामीण भागात तयार करुन त्याच ठिकाणी विक्री करण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे समोर आले आहे. यंदाच्या दिवाळीत राजस्थानी व्यावसायिकांनी विविध प्रकारच्या कला-कुसरीच्या पणत्या बाजारात आणल्या आहेत. राजस्थानी हॅन्डवर्क, कुंदनाच्या पणत्या, चिमनिच्या पणत्या अशा विविध प्रकारच्या पणत्या बाजारात दाखल झाल्या आहेत. पणत्यांची किंमतही १० ते १०० रुपयांचा दरम्यान आहेत. लाल मातिच्या पणत्यांची किंमत ३० ते ४० रुपयांच्या दरम्यान आहे. स्थानिक कुंभारवाड्यात अशा पणत्या बनविण्याचे काम जोरात सुरु आहे. गत वर्षीच्या तुलनेत या वर्षी पणत्यांच्या किमती वाढली आहे. या संदर्भात बोलताा पणती व्यावसायीक बाबासाहेब आहेरकर म्हणाले, आधुनिक काळात ग्रामीण भागात मातीच्या साध्या पणत्यात महत्व राहिले नाही. नक्षबाज कला कुसरीने साज असणाऱ्या पणत्याकडे लोकांची ओढ निर्माण झाल्याने पारंपारिक पणत्या तयार करणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढण्याची शक्यता आहे.