शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

वसुली निम्म्याने घटल्याने राज्य जीएसटी विभागाच्या झाडाझडतीने व्यापारी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 4:24 PM

औरंगाबाद व जालना मिळून १२ दुकानात एक ते दीड कोटीची कर चुकवेगिरी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांना अधिकचा वेळ द्यावायापुढेही कारवाई सुरू राहील

औरंगाबाद : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जीएसटी वसुली निम्म्याने घटल्याने  कर चुकवेगिरीच्या संशयावरून  राज्य जीएसटी विभागाने व्यापाऱ्यांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे व्यापारी वर्ग त्रस्त झाला आहे. 

आर्थिक वर्ष एप्रिल ते सप्टेंबर २०१९ या दरम्यान राज्य जीएसटी विभागात १०४० कोटी २४ लाख रुपये महसूल जमा झाला होता. यंदा एप्रिल ते सप्टेंबर २०२०  या कालावधीत ५२६ कोटी १२ लाख रुपये महसूल जमा झाला. म्हणजे मागील वर्षीपेक्षा यंदा सरकारी तिजोरीत ४९.४२ टक्के कमी  महसूल जमा झाला आहे. यामुळे उद्दिष्टपूर्ण करण्यासाठी जीएसटी विभागाने कारवाईला सुरुवात केली. दिवाळी आधी राज्य जीएसटी विभागाने कर चुकवेगिरीच्या संशयाने शहरातील व जालन्यातील ८ व दिवाळी नंतर शहरातील ४ अशा १२ दुकानाची तपासणी  केली. 

कोरोनामुळे २४ मार्च ते ४ जूनपर्यंत लॉकडाऊनमुळे दुकाने बंद होती. याचा मोठा फटका व्यापारी वर्गाला बसला. त्यातून सावरत आता व्यवहाराची गाडी रुळावर येत असताना जीएसटी विभागाने कारवाई सुरू केल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. बिल मिसमॅच होणे, उधारी वेळेवर वसूल न होणे आदी कारणामुळे अनेक व्यापारी जीएसटी भरण्याची इच्छा असतानाही तो वेळेवर भरू शकले नाही. असे अनेक कारण व्यापाऱ्यांनी सांगितले. जीएसटीच्या कारवाईमुळे प्रामाणिक व्यापारीही भरडले जात असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

दिवाळी आधी ४ किराणा दुकानदार, २ सुकामेवा व मसाला दुकानदार, मसाला १ व होजियारी १ दुकान व २ दिवसाआधी शहरतील ३ तंबाखू होलसेल दुकानात कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडील एकूण माल खरेदी, विक्री, उधारी खाते, बँक खाते आदींची तपासणी करण्यात आली व  बिल ताब्यात घेण्यात आले. औरंगाबाद व जालना मिळून १२ दुकानात एक ते दीड कोटीची कर चुकवेगिरी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अजून तपासणी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

व्यापाऱ्यांना अधिकचा वेळ द्यावाकर चुकवेगिरी करणाऱ्यांवर कारवाई करावी, यात कोणतेच दुमत नाही. मात्र, २४ मार्च ते ४ जूनदरम्यान लॉकडाऊनमुळे दुकाने बंद होती. नवरात्रानंतर व्यवहाराने गती आली व दिवाळीपर्यंत व्यवसाय चांगला झाला. कोणत्याही व्यापाऱ्यांची कर बुडविण्याची इच्छा नसते. मात्र, काही जणांकडून कर भरणे राहून गेले असेल. त्यांना चूक सुधारण्यासाठी मुदतवाढ द्यावी. कारण कोरोनामुळे सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत  ५१ टक्के जीएसटी भरला गेला आहे. - जगन्नाथ काळे, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ

यापुढेही कारवाई सुरू राहील

मागील वर्षी आर्थिक वर्षाच्या पहिल्या ६ महिन्यांच्या तुलनेत यंदा ५१४ कोटी १२ लाख रुपयांचा जीएसटी व व्हॅट कमी भरण्यात आला आहे. कर चुकवेगिरीच्या संशयावरून व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. यापुढेही कारवाई सुरू राहील. यासाठी ४ अधिकारी व  २० निरीक्षक यांचे पथक तयार करण्यात आले आहे. नियमित कर भरणारे, प्रामाणिक व्यापाऱ्यांना याचा काहीच त्रास नाही. व्यापाऱ्यांनी दिलेल्या मुदतीत, वेळेवर जीएसटी भरावा. - रवींद्र जोगदंड, उपआयुक्त, अन्वेषण विभाग, एसजीएसटी

टॅग्स :GSTजीएसटीAurangabadऔरंगाबादraidधाड