शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

प्रमुख पक्षासह एकूण १४७ उमेदवारांचे अर्ज

By admin | Updated: December 17, 2015 23:49 IST

औंढा नागनाथ : नगर पंचायत निवडणुकीची उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रमुख पक्षांसह १०२ उमेदवारांनी अर्ज दाखल केल.

औंढा नागनाथ : नगर पंचायत निवडणुकीची उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रमुख पक्षांसह १०२ उमेदवारांनी अर्ज दाखल केल. एकूण १४७ अर्ज झाले आहेत. उद्या तहसीलमध्ये सकाळी ११ वाजेपासून अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजतापासूनच अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी तहसील प्रांगणामध्ये गर्दी केली होती. गर्दीचा अंदाज घेवून प्रशासनाने सभागृहातच उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था केली होती. उमेदवारांना पिण्याचे पाणी सोडले तर बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था केली होती. प्रमुख पक्षांनी वेळ न घालवता शक्तीप्रदर्शन न करताच उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये काँग्रेसच्या वतीने प्रभाग १ सोडून १६ प्रभागात, भाजपाने प्रभाग ०३ सोडून १६ प्रभागात, शिवसेना प्रभाग ०३, ०५, ०९ सोडून १४ प्रभागात तर राष्ट्रवादीने प्रभाग ०१, ०५, १०, ११, १४, १६ सोडून ११ प्रभागातून उमेदवारांना पक्षाच्या वतीने एबी फॉर्म देवून उमेवारी निश्चित केले. तसेच एमआएम ७, बीएसपी ५, लोकजनशक्ती आरपीय (ए) आपक्ष उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उपविभागीय अधिकारी अनुराधा ढालकरी, तहसीलदार श्याम मदनूरकर यांनी उमेदवारांनी ३ च्या आत सभागृहात घेऊन अर्जांची तपासणी करुनच ते स्वीकारले. आ. डॉ. संतोष टारफे, माजी आ. गजानन घुगे, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, भाजपचे सुरजितसिंह ठाकूर व राकॉंचे तालुकाअध्यक्ष संजय दराडे, बाबूराव ढोले यांनी पक्षीय उमेदवारांचे एबी फॉर्म निर्वाचित अधिकारी अनुराधा ढालकरी यांच्याकडे सुपूर्दकेले. त्यामुळे ज्यांना उमेदवारी मिळाली, त्यांनाही आपल्या उमेदवारीबाबत शेवटपर्यंत काहीच कळाले नाही. त्यामुळे सायंकाळी ६ वाजेपर्यंत परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. (वार्ताहर)