शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

नाणेटंचाईने ग्राहक, व्यापारी मेटाकूटीस

By admin | Updated: August 3, 2014 01:16 IST

गेवराई : येथील व्यापारपेठेत एक, दोन व पाच रुपयांच्या सुट्या नाण्यांची प्रचंड टंचाई सध्या जाणवत आहे. त्यामुळे कधी-कधी ग्राहक व व्यापारी यांच्यात वादही उद्भवू लागले आहेत.

गेवराई : येथील व्यापारपेठेत एक, दोन व पाच रुपयांच्या सुट्या नाण्यांची प्रचंड टंचाई सध्या जाणवत आहे. त्यामुळे कधी-कधी ग्राहक व व्यापारी यांच्यात वादही उद्भवू लागले आहेत.गेवराई शहरात मोठी बाजारपेठ आहे. कापड, भाजीपाला, किराणा, भुसार, गॅरेजलाईन येथे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. यासह पंचायत समिती, तहसील, रूग्णालये, रजिस्ट्री कार्यालय आदी ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांची ये- जा असते. एकंदर या सर्वांमुळे येथील व्यापारपेठेतही मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होते, असे असले तरी सध्या सुट्या नाण्यांचे मात्र येथे वाणवा असल्याचे दिसून येत आहे. चहाचे हॉटेल, पानटपरी, वडापाव सेंटर, किराणा दुकान अशा विविध ठिकाणी एक, दोन व पाच रुपयांच्या सुट्या नाण्यांसाठी ग्राहक व व्यापाऱ्यात तू- तू, मै- मै होताना दिसून येत आहे. अनेकदा काही व्यापारी कागदाच्या तुकड्यावर एक- दोन रुपयांचे आकडे लिहून आपले खाजगी चलनही व्यवहारात आणत असल्याची गंभीर बाब दिसून येत आहे. तर वेळ प्रसंगी व्यापाऱ्यांना सुटे नाणे पाच ते सात रुपये शेकड्याने विकत घेण्याची वेळही येत आहे. तर काही व्यापारी सुटे पैसे देण्याऐवजी चक्क चॉकलेट देऊन ग्राहकांची बोळवण करीत असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे येथील बँकांनी सुटे नाणे उपलब्ध करून देण्याची मागणी राजू शिंदे, मनोज जैस्वाल, रामेश्वर पाटेकर, उमेश मानधने आदींनी केली.(वार्ताहर)