आजपासून एमआयसीयूत रुग्णसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 22:24 IST2019-04-21T22:24:39+5:302019-04-21T22:24:50+5:30
सोमवारपासून हा विभाग पुन्हा कार्यान्वित केला जाणार आहे.

आजपासून एमआयसीयूत रुग्णसेवा
औरंगाबाद : घाटी रुग्णालयाच्या मेडिसीन विभागातील एमआयसीयूत शनिवारी शॉर्टसर्किट झाल्यामुळे गोंधळ उडाला होता.
या घटनेनंतर येथील रुग्णांना त्वरित इतर वॉर्डांत हलविण्यात आले. येथे रविवारी दिवसभर विद्युत दुरुस्ती आणि निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया करण्यात आली.
सोमवारपासून हा विभाग पुन्हा कार्यान्वित केला जाणार आहे.