शहरं
Join us  
Trending Stories
1
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
2
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
3
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
4
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
5
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
7
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
8
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
9
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
10
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
11
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
12
कोकणात उद्धवसेनेला आणखी एक धक्का बसणार, सनसनाटी विजय मिळवणारा नेता शिंदेसेनेच्या वाटेवर
13
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
14
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
15
घरमालकाची बायको होती कॉलेज फ्रेंड, अनैतिक संबंधाचा संशय; तिसऱ्या मजल्यावरून 'ते' दोघे पडले कसे?
16
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
17
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
18
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
19
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
20
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
Daily Top 2Weekly Top 5

मनधरणीचा आज शेवटचा दिवस

By admin | Updated: October 1, 2014 00:44 IST

लातूर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यावेळी मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत़ उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा १ आॅक्टोबर शेवटचा दिवस आहे़

लातूर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यावेळी मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत़ उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा १ आॅक्टोबर शेवटचा दिवस आहे़ कोण, किती मते घेऊ शकतो, याची प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी चाचपणी सुरू केली आहे़ त्यानुसार अपक्ष उमेदवारांना माघार घेण्यासाठी विनवणी केली जात आहे़ दोन दिवसांत भ्रमणध्वनीवर संपर्क साधून ‘मन’धरणी करणारे उमेदवार आज अपक्षांना प्रत्यक्ष भेटी देऊन विनवणी करणार आहेत़ लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात १७८ उमेदवारांनी २७२ अर्ज दाखल केले होते़ त्यापैकी ३२ जणांचे अर्ज बाद झाले आहेत़ अर्जाच्या छाननीनंतर कोण कोण निवडणुकीच्या रिंगणात राहणार याची उत्सुकता लागलेल्या मतदारांना आज चित्र स्पष्ट होणार आहे़ नामनिर्देशनपत्र दाखल करताना एकमेकांना पाण्यात पाहणारे उमेदवार अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्षांना गळ लावून समर्थक वाढविण्याच्या तयारीत आहेत़ लातूर शहर मतदारसंघात सर्वाधिक ४६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते़ त्यापैकी ६ जणांचे अर्ज छाननीत अवैध ठरले आहेत़ मंगळवारी रात्री उशिरापर्यंत राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे समर्थक अपक्षांच्या संपर्कात होते़ लातूर, उदगीर, अहमदपूर, औसा, निलंगा व लातूर ग्रामीण मतदारसंघातील बहुतांश अपक्षांनी मंगळवारपर्यंत प्रमुख उमेदवारांना तळ्यात-मळ्यात ठेवले होते़ (प्रतिनिधी)लातूर शहर विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून रिंगणात असलेले माजी खा़ डॉ़ जनार्दन वाघमारे, अ‍ॅड़ बळवंत जाधव, अ‍ॅड़ मनोहरराव गोमारे हे माघार घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़ भाजपाचे अ‍ॅड़ बळवंत जाधव माघार घेणार की अपक्ष म्हणून अर्ज कायम ठेवणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे़ लातूर ग्रामीण मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या आशाताई भिसे या माघार घेतील, अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे़ त्यांच्या उमेदवारीकडे लक्ष लागले आहे़ भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहणार आहेत़ पक्षाने एबी फॉर्म दिलेले उमेदवार अपक्षांच्या मनधरणीत आहेत़ काही ‘हौसी’ उमेदवार स्वत:हूनच कोण काय देतो, याची चाचपणी करीत मंगळवारी फिरत होते़अपक्ष उमेदवारात जास्त मते घेण्याची शक्यता असलेल्या उमेवारांची राजकीय पक्षांत मनधरणी सुरू आहे़ निवडून आल्यावर तुम्हाला हवे ते पद देऊ़ तुमची इच्छा पूर्ण करू, असे आश्वासन दिले जात आहे़ तर काही अपक्षांनी आपल्या दुतामार्फत राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडे सेटलमेंटचे प्रस्ताव दिले आहे़ नवख्या असलेल्या काही उमेदवारांनी सर्वच राजकीय पक्षांचे दार ठोठावले आहे़ कोण कोणाला ‘किती’ समर्थन देतो, त्यावरून पाठिंबे निश्चित होणार आहेत़ काही ठिकाणी उमेदवारी राहु द्या म्हणून तर काही ठिकाणी काढून घेण्यासाठी विनवणी केली जात आहे़