नागपूर राड्यानंतर खुलताबादेत कडक बंदोबस्त; औरंगजेब कबरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरीकेटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 13:34 IST2025-03-18T13:34:09+5:302025-03-18T13:34:38+5:30

औरंगजेब प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या वातावरणामुळे गेल्या काही दिवसापासून औरंगजेब कबर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली आहे.

Tight security in Khultabad after Nagpur rada; Barricades on the road leading to Aurangzeb's tomb | नागपूर राड्यानंतर खुलताबादेत कडक बंदोबस्त; औरंगजेब कबरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरीकेटिंग

नागपूर राड्यानंतर खुलताबादेत कडक बंदोबस्त; औरंगजेब कबरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरीकेटिंग

- सुनील घोडके
खुलताबाद:
औरंगजेब कबर प्रकरणावरून नागपूरात रात्री झालेल्या राड्यामुळे खुलताबाद येथील औरंगजेब कबरीकडे येणारे रस्त्यावर पोलीसांनी बँरीकेट लावून कडक बंदोबस्त तैनात केला आहे. तर दर्गेत कबर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचीही कसून चौकशी केली जात आहे. 

औरंगजेब प्रकरणावरून देशभरात मोठा गदारोळ होत असून कबर उखडून फेकण्याचा इशारा काही हिंदुत्ववादी संघटनेने दिल्यामुळे खुलताबाद शहरात औरंगजेब कबर परिसरातील दर्गेला चोहोबाजूंनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. तर खुलताबाद शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यावर बॅरीकेट लावून प्रत्येक वाहनांची, पर्यटकांची आणि नागरिकांची चौकशी पोलीस करत आहेत. दरम्यान, सोमवारी रात्री नागपूर येथे दोन समाजात झालेल्या राड्यामुळे पोलीस हाय अलर्टवर आहेत. औरंगजेब कबर बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची चौकशी करण्यात येत असून त्यांचे नाव नंबर, आधार कार्ड तपासले जात असून त्याची नोंद घेतली जात आहे. तसेच कबर परिसरात मोबाईल नेण्यास बंदी घातली आहे.

पर्यटकांची संख्या रोडावली
वेरूळ लेणी, खुलताबाद भद्रा मारूती येथे आलेले पर्यटक व भाविक औरंगजेब कबर बघण्यासाठी खास करून जात असत. पंरतू औरंगजेब प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या वातावरणामुळे गेल्या काही दिवसापासून औरंगजेब कबर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली आहे. रविवारी ७०, सोमवारी ६०, मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत ९ पर्यटकांनी भेट दिल्याचे पोलीसांच्या नोंदवहीत माहिती नमूद आहे.

Web Title: Tight security in Khultabad after Nagpur rada; Barricades on the road leading to Aurangzeb's tomb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.