थरार ‘लोकमत महामॅरेथॉन’चा; धावण्याचा विक्रम नोंदविण्यासाठी छत्रपती संभाजीनगरकर सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 13:45 IST2025-12-11T13:40:29+5:302025-12-11T13:45:02+5:30
धावण्यासाठी हजारो धावपटू झाले आतुर, नोंदणी आली अंतिम टप्प्यात

थरार ‘लोकमत महामॅरेथॉन’चा; धावण्याचा विक्रम नोंदविण्यासाठी छत्रपती संभाजीनगरकर सज्ज
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरकरांसाठी आरोग्य आणि अभिमानाचा केंद्रबिंदू ठरलेली ‘लोकमत महामॅरेथॉन’ १४ डिसेंबर रोजी विभागीय क्रीडा संकुल येथे रंगणार आहे. डॉ. भाले लाइफलाइन मेडिकल डिव्हायसेस प्रस्तुत व पॉवर्ड बाय मिसेस फूड राइट व अदानी समूह लोकमत महामॅरेथॉनचे यंदा नववे पर्व असून, प्रत्येक पर्वागणिक धावपटूंचा सहभागी होण्याचा आलेख उंचावतच आहे. त्यामुळे यंदाही हा आलेख नक्कीच उंचावणार असून, लोकमत महामॅरेथॉनमध्ये छत्रपती संभाजीनगरकर धावण्याचा विक्रम नोंदविण्यासाठी सज्ज झाले आहेत. नोंदणी अंतिम टप्प्यात आली असून, लवकरात लवकर नागरिक, खेळाडूंनी आपला सहभाग निश्चित करण्याची वेळ आली आहे.
बालगोपाळांपासून वृद्ध आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा चैतन्यपूर्ण सहभाग, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल ही वैशिष्ट्य असणारी महामॅरेथॉन ३ कि. मी., ५ कि. मी. आणि २१ कि. मी. अंतरात होत आहे. तब्बल १२ लाख रुपयांपर्यंत पारितोषिके असणारी ही महामॅरेथॉन नागरिकांसाठी नेहमीच आकर्षण ठरली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे १४ डिसेंबर रोजी होणाऱ्या महामॅरेथॉनमध्ये नागरिकांना कुटुंबांसोबत धावण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. निरोगी आरोग्यासाठी आणि व्यायामाचा श्रीगणेशा करणाऱ्यांसाठीदेखील ही मॅरेथॉन मैलाचा दगड ठरणार आहे. त्यांच्यासाठी ३ व ५ कि. मी. हे अंतर असणार आहे. १२ पेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठी ५ कि. मी. अंतराच्या फन रनचाही यात समावेश आहे. तसेच प्रोफेशनल धावपटूंसाठी १० आणि २१ कि. मी. अंतर असणार आहे.
सकारात्मक उपक्रमांना पाठबळ
लोकमत समूह आयोजित या भव्य ‘महामॅरेथॉन’ उपक्रमाचे टायटल स्पॉन्सर म्हणून सहभागी होताना मला विशेष आनंद आणि अभिमान वाटतो. ‘लोकमत’सोबत जोडले जाणे हे आमच्यासाठी विश्वास, प्रतिष्ठा आणि यशाचे प्रतीक आहे. धावपळीच्या जीवनात समाजाशी नातं जोडणं, सकारात्मक उपक्रमांना पाठबळ देणं आणि वाचकांपर्यंत पोहोचणं ही ‘लोकमत’ची ओळख आहे.
-डॉ. विक्रांत भाले, मॅनेजिंग डायरेक्टर, लाइफलाइन मेडिकल डिव्हायसेस प्रा. लि.
सर्वांनी सहभाग नोंदवावा
लोकमत महामॅरेथॉनचे यंदाचे हे नववे पर्व आहे. निरोगी आयुष्याविषयी जागरूकता निर्माण करणारी ही महामॅरेथॉन आहे. या स्तुत्य उपक्रमाशी आम्ही जोडले गेलेलो आहोत. निरोगी आरोग्य आणि समाजाच्या हिताचे काम करणाऱ्या महामॅरेथॉनमध्ये सर्वांनी भरभरून सहभाग नोंदवावा.
- अनिमेष सिंग, मॅनेजिंग डायरेक्टर, मिसेस फूड राइट
सकारात्मक उपक्रमांना साथ
लोकमत महामॅरेथॉन सिझन नऊचा असोसिएट स्पॉन्सर म्हणून जोडले जाण्याचा आम्हाला अभिमान आहे. लोकमत महामॅरेथॉनद्वारे आरोग्यदायी आणि ऊर्जावान महाराष्ट्राच्या अभियानात सहभागी होऊन आनंद वाटतो. नवकार टाइल्स आणि ग्रॅनाइट सदैव सकारात्मक उपक्रमांना साथ देत राहील.
-सागर पाटणी, डायरेक्टर, नवकार टाइल्स अँड ग्रॅनाइट