शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

सराफा दुकानात चोरी करणाऱ्या तीन महिलांना पकडले

By admin | Updated: July 7, 2014 00:02 IST

तामसा : येथील आठवडी बाजारात गर्दीचा फायदा घेत सराफा दुकानात घुसून चोरी करण्याच्या उद्देशाने शिरलेल्या संशयित तीन महिलांना दुकानदाराने पकडून पोलिसांच्या हवाली केले़

तक्रारीवर कारवाईस चालढकल : मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्रपुलगाव : शेतातील अंदाजे २० ते ३० वर्षे जुनी ३० झाडे विनापरवाना तोडून नेले़ याबाबत शासनाच्या संबंधित सर्व विभागांकडे शेतकऱ्याने तक्रारी केल्या़ विभागीय आयुक्तांनी तलाठ्यास चौकशीचे आदेश दिलेत; पण भ्रष्ट व मुजोर महसूल विभागाने आयुक्तांच्या पत्रालाही केराची टोपली दाखविली़ चार महिन्यांपासून न्याय मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे आत्महत्येची परवानगी मागितली आहे़ दारासिंग उत्तरसिंग ठाकूर यांचे वर्धा नदीच्या काठावर मौजा गुंजखेडा येथे सर्वे क्ऱ ३६३/१ मधील शेतातील सुबाभुळ, उंबर, पळस, चिचबिलाई, कडूनिंब आदी प्रजातीची झाडे गिरीजाप्रसाद पांडे यांनी तोडून केली़ याबाबत त्यांनी चार महिन्यांपूर्वी तक्रार केली. महसूल विभागाने या प्रकरणी कुठलीही चौकशी केली नाही़ यामुळे ठाकूर यांनी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, मुख्यमंत्री, वन विभाग, पोलीस ठाणे यांच्याकडे सर्व पुराव्यांसह तक्रारी केल्यात; पण सुस्त प्रशासनाने कागदी घोडे दामटविण्यापलीकडे प्रत्यक्ष कारवाई केलीच नाही. यामुळे पांडे यांनी तोडलेली झाडे त्वरित लंपास करून उर्वरित झाडे पुन्हा तोडण्यास सुरुवात केल्याचे म्हटले आहे. ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतरही पटवाऱ्याने पंचनामा केला नाही.या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश विभागीय आयुक्तांनी २२ मे रोजी महसूल विभागास दिले; पण त्यांनी त्या पत्राची दखलही घेतली नाही. ठाकूर गत चार-पाच महिन्यांपासून शासन दरबारी तक्रारी करून त्रस्त झालेत़ वृक्षतोडीमुळे त्यांचे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मुजोर प्रशासन आयुक्तांच्या पत्राला दाद देत नसतील तर न्याय कोण देणार, गुन्हेगारांस दंडित कोण करणार, असा प्रश्नही शेतकऱ्याने उपस्थित केला आहे़ न्यायाची आशा धुसर झाल्याने त्यांनी मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना पत्रातून ‘आता मी आत्महत्या करू काय’, असा थेट सवाल केला आहे़(शहर प्रतिनिधी)