तीन लाखांसह तिजोरीच पळविली
By Admin | Updated: July 22, 2014 00:50 IST2014-07-22T00:42:38+5:302014-07-22T00:50:31+5:30
औरंगाबाद : जालना रोडवर पाटीदार भवनजवळ असलेले ‘चिटफंड’ कार्यालय फोडून चोरट्यांनी तेथील तिजोरीच चोरून नेल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.

तीन लाखांसह तिजोरीच पळविली
औरंगाबाद : जालना रोडवर पाटीदार भवनजवळ असलेले ‘चिटफंड’ कार्यालय फोडून चोरट्यांनी तेथील तिजोरीच चोरून नेल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या तिजोरीत तीन लाख नऊ हजार रुपये रोख रक्कम होती.
घटनेबाबत माहिती देताना जवाहरनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शेख सलीम यांनी सांगितले की, पाटीदार भवनजवळ एका चिटफंड कंपनीचे कार्यालय आहे. सोमवारी सकाळी येथील कर्मचारी कामावर आले. तेव्हा शटरचे कुलूप तुटलेले असल्याचे कर्मचाऱ्यांच्या नजरेस पडले.
शटर उघडताच आतमध्ये ठेवलेली तिजोरीच भिंत फोडून चोरट्यांनी पळविली असल्याचे दिसून आले.
जवाहरनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तेथे पोहोचले. या तिजोरीत तीन लाख नऊ हजार रुपये असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. कंपनीच्या अधिकाऱ्यांना रकमेची कागदपत्रेघेऊन फिर्याद देण्यासाठी जवाहरनगर पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले होते; परंतु सोमवारी रात्री उशिरापर्यंत कुणीही फिर्याद देण्यासाठी आले नव्हते. मंगळवारी सकाळी फिर्याद देतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले असल्याचे पोलीस निरीक्षक शेख म्हणाले.