शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाखांची महापंगत

By admin | Updated: April 10, 2015 00:37 IST

बीड : अवघ्या दीड हजार लोकवस्तीच्या हिंगणी खुर्द गावात राज्यातील सर्वात मोठ्या नारळी सप्ताहाची गुरूवारी दुपारी सांगता झाली.

बीड : अवघ्या दीड हजार लोकवस्तीच्या हिंगणी खुर्द गावात राज्यातील सर्वात मोठ्या नारळी सप्ताहाची गुरूवारी दुपारी सांगता झाली. यावेळी तीन लाखांपेक्षाही अधिक भाविकांसाठी गावकऱ्यांनी महापंगत दिली. सप्ताहाची सांगता भगवानगडाचे मठाधिपती डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.हिंगणी खुर्द गावात बुधवारी सायंकाळपासूनच या सांगता कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी भाविकांची रीघ लागली होती. तीन लाखांपेक्षाही अधिक भाविक नारळी सप्ताहाच्या या सोहळ्यासाठी उपस्थित होते. पंढरीच्या यात्रेची अनुभुती या निमित्ताने भाविकांना मिळाली. गेली सहा दिवसांपासून सप्ताहाच्या नियोजनात अडीच हजार लोक गुंतले होते. ५७ वर्षानंतर दुसऱ्यांदा हा मान हिंगणी गावाला मिळाला होता. सांगता कार्यक्रमाला न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांच्यासह खासदार प्रीतम मुंडे, आ. विनायक मेटे, केशवराव आंधळे, संदीप क्षीरसागर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. तीन लाख लोकांना ग्रामस्थांच्या वतीने गुलाबजामुनची महापंगत देण्यात आली. ३०० किलो खव्यापासून तीन दिवसांपासून गुलाबजामुन तयार करण्याचे काम सुरू होते. यासाठी ५६ लोक दिवस रात्र काम करत होते. ३० ट्रॅक्टर ट्रॉलीमधून हे गुलाबजामुन ठेवण्यात आले होते. (प्रतिनिधी)काल्याच्या कीर्तनप्रसंगी नामदेवशास्त्री महाराज म्हणाले, परीस लोखंडाचे सोने करतो. त्याप्रमाणे संतांच्या संगतीत मानवी जीवनाचे कल्याण होते. समाजाच्या सुखातच संतांचे सुख असते. बहुजन समाजातील उपेक्षितांसाठी अनेक संतांनी आयुष्य खर्ची केले.