राजेश खराडे , बीडसध्या तरुणाईला वेध लागले आहेत ते थर्टी फर्स्टचे़ त्याची तयारी अंतिम टप्प्यात असून हॉटेल, बार, परमिट रूम शौकिनांसाठी सज्ज होण्यास सुरूवात झाली आहे़ जिल्ह्यात दुष्काळाचे सावट असले तरी दारूचा पाट वाहणार असून तब्बल तीन लाख लीटर दारू घशाखाली उतारणार आहे़ शौकिनांच्या फुल्ल टू धमालला शासनानेही मूक संमती दिली आहे़ हॉटेल, बार पहाटेपर्यंत सुरू राहणार असल्याने शौकिनांना जल्लोष करण्यासाठी ‘ओव्हरटाईम’ मिळणार आहे़गतवर्षी डिसेंबर महिन्यात देशी दारूची आवक सुमारे १ लाख २६ हजार ६९० लीटर, विदेशी दारूची ६० हजार ९१५ लीटर तर बिअरची ७२ हजार ८७० लीटरची विक्री करण्यात आली होती. या वर्षी जिल्ह्यात तीन लाख लीटर दारू फेसाळणार असल्याचे उत्पादन शुल्क कार्यालयातील सूत्रांनी सांगितले़गतवर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अवैध दारूविक्रीवर निर्धंब लादण्यासाठी उत्पादन शुल्क कार्यालयाच्या वतीने अतिरिक्त पथक नेमण्यात आले होते. मात्र यंदाच्या वर्षी येथील उत्पादन शुल्क कार्यालयातील अधिक्षक पदच प्रभारी असून ५ निरीक्षक पदांपैकी एकही पद भरलेले नाही़ येथील कार्यालयातील एकूण ५३ पदांपैकी ३७ पदे ही रीक्त आहेत. त्यामुळे अवैध दारू विक्रीवर आळा बसणार कसा? असा सवाल उपस्थित होत आहे.
जिल्ह्यात फेसाळणार तीन लाख लीटर दारू
By admin | Updated: December 30, 2014 01:17 IST
राजेश खराडे , बीड सध्या तरुणाईला वेध लागले आहेत ते थर्टी फर्स्टचे़ त्याची तयारी अंतिम टप्प्यात असून हॉटेल, बार, परमिट रूम शौकिनांसाठी सज्ज होण्यास सुरूवात झाली आहे़
जिल्ह्यात फेसाळणार तीन लाख लीटर दारू
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}