शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

शहरात तीन लाख घरे, अधिकृत नळधारक केवळ १ लाख ४० हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 11:56 IST

शहराच्या पाणीपुरवठ्यात महापालिकेचे आर्थिकरीत्या कंबरडे मोडले जात आहे. मागील अनेक वर्षांपासून महापालिकेला आर्थिक तूट सहन करावी लागते.

ठळक मुद्दे५० हजार अनधिकृत नळ  दरवर्षी मनपाला ६० कोटींची तूट

औरंगाबाद : शहरात दरवर्षी किमान दहा हजार नवीन घरांची भर पडत आहे. सध्या महापालिका हद्दीत तीन लाख मालमत्ता आहेत. या तुलनेत नळ कनेक्शनची संख्या फक्त १ लाख ४० हजार आहे. ५० हजारांपेक्षा अधिक अनधिकृत नळ आहेत. महापालिकेला पाणीपुरवठ्यासाठी दरवर्षी ८० ते ९० कोटी रुपये खर्च करावे लागतात. त्यातुलनेत पाणीपट्टीतून २५ ते ३० कोटी रुपये जमा होतात. पाणीपट्टीची थकबाकी ३२१ कोटीपर्यंत पोहोचली आहे.

शहराच्या पाणीपुरवठ्यात महापालिकेचे आर्थिकरीत्या कंबरडे मोडले जात आहे. मागील अनेक वर्षांपासून महापालिकेला आर्थिक तूट सहन करावी लागते. अनधिकृतरीत्या नळकनेक्शन घेणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शहर चारही दिशेने झपाट्याने वाढत आहे. मागील अनेक वर्षांपासून महापालिकेने नवीन वसाहतींमध्ये जलवाहिन्या टाकले आणि पाणीपुरवठा करणे बंद केले. २०० पेक्षा अधिक वसाहतींना मागील आठ वर्षांपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. टँकरच्या पाणीपुरवठ्यावर महापालिका दरवर्षी तीन ते चार कोटी रुपये यावर खर्च करीत आहे.

मालमत्ता करातील जवळपास ७० टक्के रक्कम पाणीपुरवठ्यावर खर्च होते. त्यामुळे विकासकामांसाठी महापालिकेकडे पैसे शिल्लक राहत नाहीत. अनधिकृत नळ कनेक्शन महापालिकेसाठी सर्वांत मोठी डोकेदुखी आहे. अनधिकृत नळ अधिकृत करण्यासाठी प्रशासनाने अनेकदा वेगवेगळ्या योजना राबविल्या मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. ज्या नागरिकांचे अधिकृत आहेत त्यातील ७० टक्के नागरिक पैसेच भरत नाहीत. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत महापालिकेकडून वसुलीसाठी जोरदार प्रयत्न करण्यात येतात. मात्र त्यात फारसे यश येत नाही. पाणीपट्टी थकीत असलेल्या मालमत्ता धारकांचे नळ कनेक्शन खंडित करण्यास राजकीय मंडळींकडून विरोध करण्यात येतो. त्यामुळे दरवर्षी पाणीपट्टी थकबाकी चा आकडा वाढतच चालला आहे. निवासी मालमत्ताधारकांकडे २६४, तर व्यावसायिक मालमत्ताधारकांकडे ५६ कोटींची थकबाकी आहे. चालू आर्थिक वर्षात १ लाख ४० हजार नळकनेक्शनधारकांकडून ६० कोटींची मागणी करण्यात येत आहे.

शहरात दरवर्षी २ ते ३ हजाराांनी अनधिकृत नळकनेक्शनची संख्या वाढत आहे. याला महापालिका प्रशासनासोबत राजकीय मंडळींची मोठ्या प्रमाणात साथ आहे. महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला, तर नागरिकांपेक्षा सर्वाधिक ओरड राजकीय मंडळींकडून करण्यात येते. त्यामुळे या संवेदनशील विषयाकडे महापालिका प्रशासनाने फारसे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही.

३२१ कोटींची थकबाकीमागील २५ ते ३० वर्षांमध्ये महापालिकेने पाणीपट्टी वसुलीकडे कधीच गांभीर्याने लक्ष दिले नाही. प्रामाणिकपणे आणि स्वतःहून जे नागरिक पाणीपट्टी भरतात त्यावरच महापालिकेने आज पर्यंत समाधान मानले. महापालिकेच्या या भूमिकेमुळे पाणीपट्टीची थकबाकी आकाशाला गवसणी घालत आहे. ३२१ कोटी रुपये नागरिकांकडे पाणीपट्टीचे थकीत आहेत. दरवर्षी यंदा प्रमाणे वसुलीसाठी लक्ष दिले असते तर एवढ्या मोठ्या प्रमाणात थकबाकी राहिली नसती.

पाण्याची गळती कमी प्रमाणातजायकवाडी ते नक्षत्रवाडी या ६० किलोमीटर अंतरावर ठिकठिकाणी अत्यल्प प्रमाणात पाण्याची गळती आहे. शहरातही लिकेजचे प्रमाण फारसे नाही. पाण्याचे ऑडिट करताना अनधिकृत नळ डोळ्यासमोर ठेवून ४० टक्के पाण्याची गळती गृहीत धरण्यात येते. कारण अनधिकृत नळ कनेक्शनमधून जाणाऱ्या पाण्याचे पैसे महापालिकेला मिळत नाहीत.

वसुलीसाठी सर्वाधिक प्रयत्न सुरूमालमत्ता कर आणि पाणीपट्टीसाठी महापालिकेने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. नियमित वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त स्वतंत्र टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. दररोज पाच ते आठ लाखांपर्यंत वसुली होत आहे. तास फोर्सने अनेक ठिकाणी नळकनेक्शन खंडित केले आहेत. मार्चअखेरपर्यंत पूर्वीच्या तुलनेत वसुली जास्त होईल.- अपर्णा थेटे, उपायुक्त महापालिका

ठळक आकडे :१७,०००,०० लोकसंख्या३,०००,०० एकूण घरे१,४०,००० अधिकृत नळधारक५०००० अनधिकृत नळ

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीTaxकर