सव्वा लाखाच्या चोरीच्या गुन्ह्यातील पाचव्या आरोपीला कोठडी
औरंगाबाद : बेडरूमच्या उघड्या दारातून घरात प्रवेश करून घरातील एक लाख १० हजारांची रोख रक्कम आणि ४ मोबाईल असा सुमारे एक लाख ३० हजारांचा ऐवज चोरल्याच्या गुन्ह्यातील पाचवा आरोपी अबरार खान महेमूद खान याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वानखेडे यांनी गुरुवारी दिले. सहायक सरकारी वकील योगेश सरोदे यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
गंभीर जखमी केल्याच्या गुन्ह्यात दोघांना जामीन नाकारला
औरंगाबाद : जमिनीच्या वादातून सख्ख्या भावासह त्याच्या कुटुंबाला मारहाण करून गंभीर जखमी केल्याच्या गुन्ह्यात बबलू प्रल्हाद राठोड आणि प्रल्हाद नरसिंग राठोड या दोघांचे नियमित जामीन अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. मांजरेकर यांनी नामंजूर केले. सहायक सरकारी वकील नीता किर्तीकर यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
सख्ख्या भावावर चाकूहल्ला करणाऱ्याला पोलीस कोठडी
औरंगाबाद : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने सख्ख्या भावावर भाजी चिरण्याच्या चाकूने वार करून गंभीर जखमी करणारा अशोक बाबूराव नागरे याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. मांजरेकर यांनी गुरुवारी दिले. सहायक सरकारी वकील नीता किर्तीकर यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
-
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला पोलीस कोठडी
औरंगाबाद : सोळा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा रवी आसाराम दराडे याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष सत्रन्यायाधीश ए. एस. खडसे यांनी गुरुवारी दिले. सहायक लोकअभियोक्ता राजू पहाडिया यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला पोलीस कोठडी
औरंगाबाद : घरात घुसून अल्पवयीन मुलीला वाईट हेतूने स्पर्श करून, तिचा हात पकडून विनयभंग करणारा पवन ऊर्फ सोन्या प्रकाश नवगीरे याला १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष सत्रन्यायाधीश ए. एस. खडसे यांनी गुरुवारी दिले. सहायक लोकअभियोक्ता राजू पहाडिया यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
-----------------------------------------------------
अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करणारा तुरुंगात रवाना
औरंगाबाद : अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करणारा ऋषिकेश शशिकांत चिलघर याची न्यायालयीन कोठडीत हर्सुल तुरुंगात रवानगी करण्याचे आदेश विशेष सत्रन्यायाधीश ए. एस. खडसे यांनी गुरुवारी दिले.
विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त करणारे तिघे तुरुंगात
औरंगाबाद : व्यवसायासाठी माहेरहून १० लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी छळ करून गर्भवती विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करणारा तिचा पती अमोल अण्णासाहेब त्रिभुवन, सासरा अण्णासाहेब विठ्ठल त्रिभुवन आणि नणंद भाग्यश्री सुमीत महांकाळे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी गुरुवारी दिले.