शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
8
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
9
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
10
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
11
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
12
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
13
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
14
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
15
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
17
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
18
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
19
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
20
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांचा जीव धोक्यात

By admin | Updated: July 27, 2014 01:15 IST

जालना : शहरातील मियाँसाब दर्गा भागातील नव्यावस्तीत एकाच पोलवर सुमारे ३० ते ४० वीज जोडणी दिलेली आहे.

जालना : शहरातील मियाँसाब दर्गा भागातील नव्यावस्तीत एकाच पोलवर सुमारे ३० ते ४० वीज जोडणी दिलेली आहे. गल्लीत खांब नसल्याने एका खांबावरुन वीज जोडणी घेण्यासाठी नागरिकांना केबल वायरला बांबू व लाकडाचा आधार द्यावा लागत आहे.
महावितरणकडे गल्लीत खांब टाकण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने या भागातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
जुना जालना भागातील मस्तगड परिसरात कुंडलिका नदीच्या काठावर प्राचीन मियाँसाब दर्गा आहे. या दर्गा परिसरात जुनी व नवीन अशा दोन वस्त्या आहेत. नवीन वस्त्यात एका गल्लीत सुमारे ३० ते ४० घरे आहेत. या घर मालकांनी महावितरण कडून नियमाप्रमाणे वीजजोडणी घेतलेली आहे. मात्र ही वीज जोडणी गल्लीच्या एका टोकावर असलेल्या एका खांबावरून देण्यात आली. गल्लीत स्वतंत्र असे खांब लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे एकाच खांबावरून ही वीज जोडणी केलेली आहे. खाबांपासून घरांचे अंतर जास्त असल्याने वीज जोडणी करणाऱ्याला जास्तीच्या केबल वायरसह ती घरापर्यंत घेण्यासाठी खांब ते घर दरम्यान बांबू व लांब लाकडाचा खर्च करावा लागला. बांबू व लाकडाच्या आधारावरच केबल घरापर्यंत आलेली आहे. सध्या पावसाळा असल्याने लाकडाचा आधार ढिल्ला होऊन केबल लोंबकळत आहे. केबलवायरसाठी अतिरिक्त खांब देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. (प्रतिनिधी)
वर्षभरापासून पाठपुरावा तरीही खांब मिळेनात
या गल्लीत स्वतंत्र चार ते पाच खांब देण्यात यावे. त्यावरून संबंधितांना वीज जोडणी देण्यात यावी अशी मागणी या भागातील नागरीकांनी केलेली आहे. त्यासाठी मागील वर्षभरापासून महावितरण कडे नागरीक पाठपुरावा करीत आहेत.
या भागात एकाच पोलवरून सुमोरे १९ फुट ते ६०० फुटापर्यंत वायर बांबू व लाकडाच्या मदतीने ३० ते ४० ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली. त्यामुळे हे वायर खाली लोंबकळत आहेत. शॉर्टसर्कीट होण्याचाही धोका आहे. त्यामुळे नागरीकांचा जीव धोक्यात आलेला आहे. नागरीकांनी मागणी करून व कार्यालयात खेटे मारूनही संबंधीत अभियंता याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या भागातील नागरीकांनी केला आहे.