देशमुख हत्येच्या निषेधार्थ हजारोंचा जनआक्रोश मोर्चा : धनंजय मुंडे, वाल्मिक कराडविरोधात घोषणा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 17:19 IST2025-01-19T17:18:31+5:302025-01-19T17:19:15+5:30

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या आणि परभणी येथे पाेलीस कोठडीत सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू या दोन्ही घटनांच्या नोंदविला निषेध

Thousands of people protest against Deshmukh's murder: slogan against Dhananjay Munde, Valmik Karad | देशमुख हत्येच्या निषेधार्थ हजारोंचा जनआक्रोश मोर्चा : धनंजय मुंडे, वाल्मिक कराडविरोधात घोषणा...

देशमुख हत्येच्या निषेधार्थ हजारोंचा जनआक्रोश मोर्चा : धनंजय मुंडे, वाल्मिक कराडविरोधात घोषणा...

बापू सोळुंके छत्रपती संभाजीनगर: लढा फक्त माणुसकीचा, ना पक्ष ना जात-पात केवळ अन्यायावर आघात, संतोष देशमुख व सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवा, संतोष देशमुख आणि सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी फलक दर्शवित आणि हातात भगवे व निळे झेंडे हातात घेऊन हजारो नागरीकांनी रविवारी दुपारी शहरात जनआक्रोश मोर्चा काढला. क्रांतीचाैकातून निघालेल्या या मोर्चाचा समारोप विभागीय आयुक्त कार्यालयासमोर दिल्लीगेट येथे आयोजित सभेत झाला.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे मागील महिन्यात अपहरण करुन त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. परभणी येथील आंदोलक सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ मराठवाड्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. दाेन्ही घटनांतील आरोपींना तातडीने अटक करावी आणि दोषींना फासावर लटकाविण्यात यावे या मागणीसाठी रविवारी शहरात सर्व पक्षीय आणि सर्वधर्मिय जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी साडेबारा वाजता क्रांतीचौक येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मोर्चाला सुरवात झाली.

या मोर्चात मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील, मृत देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, मुलगी वैभवी आणि मुलगा विराज तसेच मृत सुर्यवंशी यांच्या कुटुंबातील प्रेमनाथ सुर्यवंशी,सायली विटेकर आणि दिगंबर विटेकर, विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ.अंबादास दानवे, आ.सतीश चव्हाण, माजी खा. इम्तियाज जलील, अभिजीत देशमुख, विनोद पाटील यांच्यासह हजारो समाजबांधव आणिक्रांतीचौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन करुन मोर्चाला सुरवात झाली. मोर्चा पैठणगेट, गुलमंडी, सिटीचौक मार्गे जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानासमोरून अण्णा भाऊ साठे चौकातून विभागीय आयुक्तालय येथे गेला. तेथे एका आयोजित सभेत मोर्चाचे विसर्जन करण्यात आले.

भगवे ,निळे झेंडे आणि संताप व्यक्त करणारे फलक
लढा फक्त माणुसकीचा, ना पक्ष ना जात-पात केवळ अन्यायावर आघात, संतोष देशमुख व सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवा, संतोष देशमुख आणि सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी फलक आंदोलकांच्या हातात होते. शिवाय शेकडो हातात भगवे आणि निळे झेंडे होते.

मंत्री धनंजय मुंडे, वाल्मिक कराडविरोधात घोषणा...
मूक मोर्चा असेल कोणीही घोषणा देऊ नये,असे आयोजकांनी सांगितले होते. मात्र मोर्चातील अनेक देशमुख हत्या प्रकरणातील सहआरोपी वाल्मिक कराड विरोधात घोषणा देत होते. यासोबत मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या घोषणा मोर्चेकरी देत होते.

Web Title: Thousands of people protest against Deshmukh's murder: slogan against Dhananjay Munde, Valmik Karad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.