शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
2
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
3
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
4
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
5
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
6
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
7
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
8
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
9
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
10
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
11
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
12
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
13
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
14
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
15
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
16
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
17
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
18
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
19
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
20
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

साठ कोटींवर मावेजा वाटप

By admin | Updated: August 26, 2014 00:26 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र ९ च्या चौपदरी करणासाठी जिल्ह्यातील तीन तालुक्यातील २७ गावांतील जमिनी संपादित करण्यात आल्या असून

उस्मानाबाद : जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र ९ च्या चौपदरी करणासाठी जिल्ह्यातील तीन तालुक्यातील २७ गावांतील जमिनी संपादित करण्यात आल्या असून संबधित शेतकऱ्यांना आतापर्यंत भूसंपादन मांजरा प्रकल्प कार्यालयाच्या वतीने ६० कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत.उस्मानाबाद जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र ९ ( नवीन ६५) हा तुळजापूर, लोहारा व उमरगा या तालुक्यातील अनुक्रमे ११,२ व १४ या प्रमाणे २७ गावातून जात असून या गावातील २७८.६७ हेक्टर क्षेत्र संपादन करुन भुसंपादनाची प्रकिया पूर्ण करण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग कायदा १९५६ चे कलम ३ जी प्रमाणे निवडी ही अंतिम करण्यात आली आहे. २६ गावांचा निधीप्राप्त असून त्यापैकी २४ गावातील संपादित क्षेत्राचा मोबदला वाटप करण्यात आलेला आहे.उर्वरित दोन गावातील मोबदला वाटपाची कार्यवाही सुरु आहे. तसेच निधी वाटप करण्यात आलेल्या २४ पैकी २१ गावातील संपादित क्षेत्राचा ताबा घेण्यात आला आहे.यात धाकटीवाडी, थोरलीवाडी, येळी, रामपूर, भोसगा, मुर्टा, बाभळगांव, खानापूर, जगदाळवाडी, तलमोड, कराळी, तुरोरी, आलियाबाद, मुळज, महालिंगरायवाडी, दस्तापूर, जळकोट, केरुर, येणेगुर, दाळीब, अणदूर, धनगरवाडी, फुलवाडी, ईटकळ, उमरगा ग्रा, नळदुर्ग जकेकुर असे तुळजापूर, लोहारा व उमरगा या तालुक्यातील २७ गावांचा समावेश आहे. तसेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग सरकार यांचे नावे सातबारा उताऱ्यावर नोंदी करण्यात आल्या असून तीन गावातील मोबदला वाटपाची कार्यवाही सुरु असल्याची माहिती मांजरा भूसंपादन उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांनी दिली. (प्रतिनिधी)राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरीतराष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊसाठी खानापूर ते जगदाळवाडी २६९/८०० ते ३४८ / ८०० किलो मीटर पर्यंत आहे. यासाठी तुळजापूर तालुक्यातील ११ गावे, उमरगा १४ तर लोहारा मधील २ असे २७ गावातील जमीन संपादित करण्यात आल्या आहेत. याचे एकूण क्षेत्र हे २७८ हेक्टर ७६ आर असल्याचे भूसंपासन मांजरा प्रकल्पाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच गावातील संपादीत क्षेत्राचा ताबा महसुल यंत्रणेने घेतला असून, तो राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरीत करण्यात आल्याचेही ते म्हणाले.