शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

४५ हजार लोकांची भागतेय टँकरवर तहान

By admin | Updated: April 16, 2016 01:36 IST

हिंगोली : जिल्ह्यात प्रशासनाने टँकरवरच भर देणे सुरू केले असून आता टंचाईचा काळ कमी असल्याने इतर उपायांपेक्षा हा पर्याय स्वस्त असल्याचे त्यांना वाटत आहे.

हिंगोली : जिल्ह्यात प्रशासनाने टँकरवरच भर देणे सुरू केले असून आता टंचाईचा काळ कमी असल्याने इतर उपायांपेक्षा हा पर्याय स्वस्त असल्याचे त्यांना वाटत आहे. मात्र काही गावांना टंचाईत कामे केल्यास कायमस्वरुपी उपाय होणार आहे. त्यामुळे दुरुस्ती व इतर पर्यायही डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे.एप्रिल महिना अर्ध्यावर आला आहे. मे महिना काढला तर जूनमध्ये यंदा वेळेवर मान्सून दाखल होईल, अशी प्रशासनाला आशा आहे. हवामान खात्याचा अंदाज कितपत खरा ठरेल, याचा नेम नाही. मात्र त्यामुळे नव्या उपायांपेक्षा टंचाई असल्याचे दिसून आले की, थेट टँकर सुरू केले जात आहे. एखाद्या गावात दुरुस्ती अथवा पूरक योजनेने कायमचा स्त्रोत उभा राहात असल्यास त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शिवाय अधिग्रहणांकडेही कल आहे. मात्र काही गावांत लोकसंख्येनुसार हे स्त्रोत अपुरे पडत आहेत. परंतु शासकीय नियमांची अडचण समोर करीत जनतेला आहे त्या परिस्थितीतच टंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या अधिग्रहणांची संख्या २७६ वर पोहोचली आहे. यात टँकरसाठी केलेल्या अधिग्रहणांचाही समावेश आहे. त्यात हिंगोली-२९, कळमनुरी-५९, सेनगाव-६९, वसमत-७७ तर औंढा नागनाथ ४२ अशी तालुकानिहाय संख्या आहे. यापैकी २२ अधिग्रहणे ही टँकरसाठी केलेली आहेत.यात टँकरवर तहान भागत असलेल्यांची हिंगोली-१६२३0, कळमनुरी-१२४0४, वसमत-७६६१ व औंढा ८६४५ अशी लोकसंख्या आहे. सेनगावात मात्र अद्याप एकही टँकर सुरू नाही. (प्रतिनिधी)हिंगोली तालुक्यात बळसोंड, कारवाडी व कनका या तीन गावांसाठी ७ टँकर, कळमनुरी तालुक्यात महालिंगी तांडा, खापरखेडा (पानबुडेवस्ती), पेठवडगाव, सिंदगी, पोत्रा, माळधावंडा, दाभळी, कुपटी, शिवणी बु., येडशी या दहा गावांसाठी १0 टँकर सुरू आहेत. सेनगाव तालुक्यात मात्र अजून एकाही ठिकाणी टँकरची गरज भासली नाही. या तालुक्यातील काही गावांत घेतलेल्या नवीन बोअर्सला पाणी लागल्याचाही हा परिणाम आहे. वसमत तालुक्यात लहान, लोन, पळसगाव, वाखारी, बाभूळगाव या पाच गावांत पाच तर औंढा तालुक्यातील रामेश्वर, काकडदाभा, संघानाईक तांडा, काळापाणी तांडा, कोळीतांडा, चिंचोली नि., लक्ष्मणनाईक तांडा या ७ गावांत ५ टँकर सुरु आहेत. एकूण २७ टँकरच्या ७५ खेपा या गावांत होत असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.