शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

तहानलेल्या बिबट्याचा शेतातील रसायनयुक्त पाणी पिल्याने तडफडून मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 2:06 PM

तालुक्यातील पिंपरी शिवारात आज सकाळी नंबर 61 मध्ये एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला.

खुलताबाद (औरंगाबाद ) : तालुक्यातील पिंपरी शिवारात आज सकाळी एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला. वनविभाग व ग्रामस्थांनी बिबट्यावर अंत्यसंस्कार केले असून रसायन युक्त पाणी पिल्याने बिबट्याचा अंत झाल्याची माहिती वनक्षेत्रपाल यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी शिवारात अंकुश राजाराम अधाने यांची गट नंबर 61 मध्ये शेती आहे. आज सकाळी अधाने यांना त्यांच्या मका पिकाच्या शेतात एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. अधाने यांनी याची माहिती चिंचोली येथील उपसरपंच रामहरी बोडखे, संजय राजपूत ,साईनाथ बोडखे यांना दिली असता त्यांनी वनविभागाला माहिती देत घटनास्थळी धाव घेतली. यानंतर वनक्षेत्रपाल यशपाल दिलपाक व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाची पाहणी केली व ग्रामस्थांच्या सहाय्याने बिबट्यावर अंत्यसंस्कार केले. 

पाण्याच्या शोधात आला होता बिबट्या या शिवारात नेहमी बिबट्याचा वावर असून बाजुला वनविभागाचे सुमारे पाचशे एकराचे डोंगर व वनजमीन आहे.मात्र येथे वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची कुठल्याही प्रकारची सोय नाही. यामुळे पाण्याच्या शोधात हे प्राणी अनेकदा मानवी वस्ती कडे धाव घेतात. 

रसायनयुक पाण्याने झाला अंत या शिवारात शेतकरी सध्या पिकाला रोग नियंत्रकाची मात्रा पाण्याद्वारे देत आहेत. यासाठी रसायन बकेटमध्ये पाण्यात मिसळून ते ठिबक द्वारे पिकांनी दिले जाते. येथील शेतकऱ्याने याच पद्धतीने बकेटीतील पाण्यात रसायन मिसळून ते ठिबक द्वारे दिले. मात्र उरलेले रसायनयुक्त पाणी बकेटमध्येच होते. याच दरम्यान तहानलेला बिबट्या पाण्याच्या शोधात शेतात आला व त्याने हे रसायनयुक्त पाणी पिले. बकेटमधील पाण्यात रसायनाची अत्यंत जहाल मात्रा असल्याने बिबट्याचा तिथेच तडफडून मृत्यू झाला असल्याची माहिती वनक्षेत्रपाल यशपाल दिलपाक यांनी दिली आहे.

टॅग्स :leopardबिबट्याDeathमृत्यूforestजंगलKhulatabadखुल्ताबादAurangabadऔरंगाबादwildlifeवन्यजीव