शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चापानेर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

By admin | Updated: July 7, 2014 00:42 IST

चापानेर : चापानेर परिसरात दि. ६ जुलै रोजी मध्यरात्री २ ते ४ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालून शेतवस्त्यांवरील घरात घुसून सोने व रोख रक्कम घेऊन पोबारा केला.

चापानेर : चापानेर परिसरातील हसनखेडा व जवळी खुर्द शिव वस्त्यावर दि. ६ जुलै रोजी मध्यरात्री २ ते ४ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालून शेतवस्त्यांवरील शेतकऱ्यांच्या घरात घुसून सोने व रोख रक्कम घेऊन पोबारा केला. चोरट्यांच्या दहशतीचा शेतवस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांनी मोठा धसका घेतला आहे.पाऊस नसल्यामुळे सध्या वातावरणात उकाडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतवस्तीवर राहणारे शेतकरी घराच्या बाहेर झोपत असल्याचा फायदा शेतकऱ्यांनी उचलला. चापानेर शिवारातील विलास शंकर हिलाले हे त्यांच्या कुटुंबासह घराच्या बाहेर झोपले होते. घराची कडी उघडून चोरट्यांनी दीड तोळे सोने, रोख रक्कम वीस हजार रुपये व भारतीय स्टेट बँकेचे एटीएम कार्ड घेऊन पोबारा केला. चोरटे चोरी करून गेले तरी त्याची खबर त्यांना लागली नाही.अशीच चोरी त्यांच्या घरापासून पाचशे फूट अंतरावरील रामहरी कारभारी पवार हे घराच्या बाहेर झोपलेले होते. चोरट्यांनी घराची कडी उघडून कपाट, पेटी उघडून तीन तोळे सोने व रोख रक्कम सहा हजार रुपये घेऊन पोबारा केला. विशेष म्हणजे दोन्ही शेतकऱ्यांकडे कुत्रे असतानाही त्यांनी ओरड केली नाही किंवा कुणालाही जाग आली नाही. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा बाळू बाबुराव दरेकर, अनिल सीताराम माळी यांच्या शेतात वळविला. त्यांच्याकडील रोख रक्कम घेऊन ते पसार झाले. त्यानंतर हसनखेडा येथील दिलीप सावळीराम दळवी यांच्या शेतवस्तीवरील शेतात चोरी करीत असताना घरातील महिलेला जाग आल्याने तिने ओरड केल्याने चोरटे पळून गेले. चोरट्यांनी कोणाला मारहाणही केली नाही. शेतकरी थोडा जरी आवाज झाला किंवा कुत्र्यांनाही त्याची चाहूल लागली की जागी होतात; मात्र या चोऱ्या होत असताना कुठलाही गोंधळ किंवा चाहूल लागली नाही, याचे आश्चर्य शेतकरी व्यक्त करीत आहेत. (वार्ताहर)रात्रीची गस्त वाढविण्याची मागणीचोरट्यांच्या धुमाकुळीने शेतवस्त्यावरील राहणारे शेतकरी भयभीत झाले आहेत. या घटना कन्नड व देवगाव रंगारी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्या. आठ दिवसांपूर्वी विटा येथून बैल, तर चापानेर बसस्थानकावरील देवीदास भाडाईत यांच्या किराणा दुकानासमोरून दोनशे लिटर भरलेली गोडेतेलाची टाकी चोरी झाली होती. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी चापानेरसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.