'ड्राय डे'ला चोरट्यांनी हॉटेल फोडले; सव्वादोन लाखांचे विदेशी मद्य, रोकड, संगणक लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 17:24 IST2022-04-16T17:23:50+5:302022-04-16T17:24:40+5:30

२ लाख २२ हजार रुपयांच्या विदेशी मद्याच्या बाटल्या, संगणक, होम थिएटर व रोख रक्कम असा २ लाख ८७ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल लंपास

Thieves broke bar and restaurant on Dry Day; 2.2 lakhs worth of foreign liquor, cash, computer looted | 'ड्राय डे'ला चोरट्यांनी हॉटेल फोडले; सव्वादोन लाखांचे विदेशी मद्य, रोकड, संगणक लंपास

'ड्राय डे'ला चोरट्यांनी हॉटेल फोडले; सव्वादोन लाखांचे विदेशी मद्य, रोकड, संगणक लंपास

कन्नड ( औरंगाबाद ) : कन्नड शहरा लगतच्या सोलापुर-धुळे बायपासवरील एका बियर बार व रेस्टॉरंटचे कुलूप तोडून चोरट्यांनी २ लाख ८७ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. प्राथमिक माहितीमध्ये चोरट्यांनी विदेशी मद्य, संगणक आणि रोख रक्कम लंपास केली आहे. 

अंकुश फकीरराव जाधव यांचे शहरा लगतच्या सोलापुर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर द्वारकामाई बार आणि रेस्टॉरंट आहे. दि.१३ एप्रिल रोजी रात्री सव्वा दहा वाजता जाधव, हॉटेल मॅनेजर गुलाब काळे आणि वेटर प्रशांत तुपे हे हॉटेल बंद करून गेले. यावेळी हॉटेलमध्ये विदेशी मद्य, ३३ हजारांची गल्ल्यात रोख रक्कम होती. 

दुसऱ्या दिवशी दि. १४ एप्रिल रोजी ड्राय डे असल्याने हॉटेल बंद होते. दि १५ रोजी सकाळी साडे आठ वाजता हॉटेल उघडण्यास गेले असता त्यांना हॉटेलचा पाठीमागचा दरवाजा उघडा दिसला. चोरीच्या उद्देशाने कुलूप तोडल्याचा संशय आल्याने त्यांनी आत जाऊन पाहणी केली. 

यावेळी २ लाख २२ हजार रुपयांच्या विदेशी मद्याच्या बाटल्या, संगणक, होम थिएटर व रोख रक्कम असा २ लाख ८७ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि दिनेश जाधव करीत आहेत.

Web Title: Thieves broke bar and restaurant on Dry Day; 2.2 lakhs worth of foreign liquor, cash, computer looted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.