शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

आरोग्य सुविधेत वाढ होणार; औरंगाबाद महापालिका शहरात ११ आधुनिक रुग्णालये उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 13:35 IST

Aurangabad Municipal Corporation : पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या सूचनेनुसार स्मार्ट हेल्थ उपक्रमांतर्गत सातारा, देवळाई, विटखेडा, हर्षनगर येथे प्रत्येकी ७५ लाख रुपये खर्चुन आरोग्य केंद्र उभारण्यात येईल.

औरंगाबाद : घाटी रुग्णालयावरील वाढत्या रुग्णांचा ताण कमी करण्यासाठी महापालिका आणि स्मार्ट सिटी प्रशासनाने बुधवारी एक मोठे पाऊल उचलले. स्मार्ट सिटीतून तब्बल ४० कोटी रुपये खर्च करून आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला (There will be an increase in health facilities in Aurangabad) . आंबेडकरनगर, सिडको एन-२ कम्युनिटी सेंटरजवळ १० कोटी रुपये खर्च करून दोन मोठी रुग्णालये उभारण्यात येतील. गजानननगरात २ कोटींचे आणखी एक रुग्णालय उभारण्याचा मनोदय स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पाण्डेय यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री सुभाष देसाई ( Subhash Desai ) यांच्या सूचनेनुसार स्मार्ट हेल्थ उपक्रमांतर्गत सातारा, देवळाई, विटखेडा, हर्षनगर येथे प्रत्येकी ७५ लाख रुपये खर्चुन आरोग्य केंद्र उभारण्यात येईल. नवीन आरोग्य केंद्र उभारण्यासाठी अनेक ठिकाणी जागा नाही, त्यामुळे मिसारवाडी, राजनगर, मुकुंदवाडी, गरमपाणी, आंबिकानगर, जयभवानीनगर, पुुंडलिकनगर या भागात जागांचा शोध घेण्यात येत आहे. महापालिकेचे आरोग्य केंद्राच्या काही इमारती मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे सिल्कमिल कॉलनी, कैसर कॉलनी, बन्सीलालनगर, सिडको एन-८, राजनगर, चिकलठाणा, जवाहर कॉलनी, नेहरूनगर, पदमपुरा, औरंगपुरा, जुना बाजार, मुकुंदवाडी, औषधी भांडारसाठी नवीन इमारत उभारण्यात येईल.

एकीकडे आरोग्य यंत्रणा मजबूत करताना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळही लागणार आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनयूएचएम) अंतर्गत नवीन आरोग्य केंद्रांसाठी मनुष्यबळ पुरविण्याचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. नवीन आरोग्य केंद्राच्या उभारणीचे काम सुरू होताच मनुष्यबळाचा प्रस्ताव पाठवला जाईल, असे पाण्डेय यांनी सांगितले.

३९ आरोग्य केंद्रे, ५ रुग्णालयेमहापालिकेकडून सध्या शहरात ३९ आरोग्य केंद्रे, ०५ रुग्णालये चालविण्यात येतात; परंतु दर्जेदार आरोग्य सुविधा नागरिकांना मिळत नाही. रुग्णालये, आरोग्य केंद्रांमध्ये किरकोळ आजारांवर उपचार केले जातात. त्यामुळे मागील काही वर्षांमध्ये घाटी रुग्णालयावरील ताण प्रचंड वाढला आहे.

डीपीआर तयार करण्याची सूचनास्मार्ट सिटी योजनेतून ४० कोटी रुपये आरोग्य व्यवस्थेवर खर्च होणार आहेत. शहरातील मनपाचे मोठे रुग्णालये स्पेशालिस्ट असतील. तेथे मोठ्या आजारांवर उपचार होतील. सध्या प्रकल्प आराखडा तयार करण्याची सूचना केली आहे. मार्च २०२२ मध्ये कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षाही पाण्डेय यांनी व्यक्त केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाhospitalहॉस्पिटल