“समोर मर्डर झालाय, दागिने काढून ठेवा!”; भरदिवसा महिलेचे पाच तोळ्यांचे दागिने लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 12:51 IST2025-01-15T12:51:44+5:302025-01-15T12:51:54+5:30
“समोर परिसरात मर्डर झालाय, अंगावरील दागिने काढून ठेवा,” असे सांगत तोतया फौजदाराने घाबरवून टाकले.

“समोर मर्डर झालाय, दागिने काढून ठेवा!”; भरदिवसा महिलेचे पाच तोळ्यांचे दागिने लुटले
छत्रपती संभाजीनगर : “समोर मर्डर झालाय, दागिने काढून ठेवा,” असे म्हणत एका तोतया फौजदाराने ५० वर्षीय महिलेचे पाच तोळ्यांचे दागिने लुटले. १२ जानेवारी रोजी भरदिवसा दुपारी १२ वाजता गजानन मंदिर रोडवरील रिलायन्स मॉल परिसरात ही घटना घडली.
नंदा काळे (रा. देवळाई) या कामानिमित्त मॉलमागील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोरून जात होत्या. यावेळी त्यांच्या मागून जात एका अज्ञाताने त्यांना आवाज देऊन थांबवले. “समोर परिसरात मर्डर झालाय, अंगावरील दागिने काढून ठेवा,” असे सांगत घाबरवून टाकले. नंदा यांना संशय आल्याने त्यांनी दागिने काढले नाहीत. लुटारूंनी त्यांना ‘सतत दागिने काढा, आम्ही ते व्यवस्थित ठेवून देतो,’ असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, नंदा यांना संशय आल्याने त्यांनी दागिने काढून हातातच ठेवले. त्यानंतर मात्र, दुसऱ्या इसमाने त्यांच्या हातातील ५ तोळ्यांच्या सोन्याच्या दोन बांगड्या हिसकावून घेत पोबारा केला.