शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातून नव्या योजनांचा एकही प्रस्ताव नाही; १७ रोजी काय मिळणार याकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 18:59 IST

जुन्या घोषणांवर सुरू आहे मंथन

छत्रपती संभाजीनगर : यंदा मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक होणार नाही, तसेच विभागातील आठही जिल्ह्यांतून एकाही नवीन योजनेचा प्रस्ताव शासनाकडे जाणार नाही. त्यामुळे यंदा १७ सप्टेंबर दिवशी मुख्य ध्वजारोहणाप्रसंगी विभागाच्या पदरात भाषणांव्यतिरिक्त काय पडणार, याकडे लक्ष आहे. दोन वर्षांपूर्वी केलेल्या ६० हजार कोटींच्या पॅकेजच्या घोषणांपैकी किती अंमलात आल्या? किती निधी आला? याचीच उजळणी सध्या विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर व टीम करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पावसामुळे मराठवाड्यातील खरीप हंगामाचे अतोनात नुकसान झाले आहे. सध्या सुरू असलेले पंचनामे हे प्राथमिक स्वरूपाचे आहेत. मराठवाड्यातील सुमारे २० टक्के रस्त्यांचे नुकसान होण्याची शक्यता असून, काही ठिकाणच्या सिंचन प्रकल्पांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. विभागातील नुकसानीच्या आढाव्यातच प्रशासन गुंतलेले आहे. गेल्या आठवड्यात विभागीय आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेऊन जिल्हानिहाय विकासकामांची सद्य:स्थिती आणि नवीन गरजा जाणून घेतल्या होत्या; परंतु काहीही ठोस माहिती समोर आली नाही. त्यामुळे शासनाकडे कुठलाही प्रस्ताव पाठविला नाही, किंबहुना शासनानेदेखील जिल्हानिहाय विकास कामांची जंत्री प्रशासनाकडून मागविली नाही.

मुक्तिसंग्राम स्मारकाला मुहूर्त कधी?मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यामुळे १७ सप्टेंबरला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्या लढ्याचे प्रतीक आणि भावी पिढीला या लढ्यातून प्रेरणा मिळावी, यासाठी लेबर कॉलनी परिसरातील साडेचार एकर जागेत १०० काेटींतून स्मारक उभारण्याची घोषणा होऊन १७ सप्टेंबर रोजी २ वर्षे होत आहेत. ते स्मारक देखील शासनाला दोन वर्षांत उभारता आले नाही. १५० कोटींचा खर्च जास्त असल्यामुळे सुधारित प्रस्ताव सादर करावा, असे समितीकडून प्रशासनाला सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

यंदा मंत्रिमंडळ बैठक का नाही?लोककल्याणकारी योजनांमुळे मोठ्या प्रमाणात अनुदान वाटप होत आहे. त्यामुळे शासनाच्या तिजोरीत विकास कामांसाठी व आजवर केलेल्या कामांची बिले देण्यासाठी रक्कम शिल्लक नाही. त्यामुळे यंदा मंत्रिमंडळ बैठक घेतल्यास काय जाहीर करणार, या प्रश्नामुळे नवीन प्रस्ताव देखील मागविले नाहीत, अशी चर्चा आहे. २०२३ साली मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. २०२४ साली १५०० कोटींची नवीन घोषणा झाली. २०२३ सालच्या ४५ हजार कोटींच्या पॅकेजसह सिंचनासाठी १४ हजार कोटींची स्वतंत्र घोषणा केली, त्यातील किती कामे झाली, याचे माहिती संकलन सध्या सुरू आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMarathwadaमराठवाडा