शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

... तर बँकेच्या दारात बसू

By admin | Updated: May 16, 2016 23:56 IST

हिंगोली : शेतकरी हा निसर्गाच्या अवकृपेमुळे तब्बल चार वर्षांपासून डबघाईला आला आहे. त्याच्यावर उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे.

हिंगोली : शेतकरी हा निसर्गाच्या अवकृपेमुळे तब्बल चार वर्षांपासून डबघाईला आला आहे. त्याच्यावर उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे. त्यामुळे बँकांनी मागेल त्याला पीककर्ज दिलेच पाहिजे नसता आम्ही बँकेच्या दारात बसू असा इशारा फळबागा वाचवा अभियान व खरीप हंगाम नियोजन शेतकरी मेळाव्यात खा. राजीव सातव यांनी दिला. आ. तान्हाजी मुटकुळे, आ. डॉ. संतोष टारफे, जिल्हाधिकारी तुकाराम कासार, सीईओ मधुकर आर्दड, अ. मुकाअ ए. एम. देशमुख, तहसीलदार किरण अंबेकर, डॉ. पी. पी. शेळके, कृषी शास्त्रज्ञ आळसे, जयाजी पाईकराव आदींची उपस्थिती होती. सातव म्हणाले, कोणाच्याही चुका न काढता, सद्य:परिस्थितीत शेकऱ्याला वाचविण्यासाठी कोणते प्रयत्न शक्य आहेत ते करा. कोणती बँक कर्ज देत नसेल तर शेतकऱ्यांनी आ. मुटकुळे, आ. टारफे व माझ्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सातव यांनी केले. पाणीटंचाई निवारणात गतिमानता नाही. पावसाळा आला तरीही प्रस्ताव मंजुरीतच आहेत. पशुसंवर्धनच्या कामकाजाबद्दलही खा. सातव यांनी नाराजी व्यक्त केली. सध्या गुरांना साथरोग सुरु असून पावसापूर्वी व नंतरचे साथरोग आटोक्यात आणण्यासाठी या विभागाचे अधिकारी सज्ज असणे गरजेचे असतानाही ते राहत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कासार म्हणाले, फळबाग वाचवा अभियान राबवायला उशिर झाला. त्याऐवजी शेतकरी वाचवा अभियान असा उलेख करुन उर्वरितांसाठी तरी प्रशासनासह सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. पीककर्जासाठी तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांना तालुका स्तरावर बँक अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. दर सोमवारी सायंकाळी ४ ते ५ या वेळात बैठका होतील. आ. मुटकुळे म्हणाले, सध्याचे सिंचनक्षेत्र दहा टक्के असून ते चाळीस टक्क्यांवर नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी आम्ही राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवू. मात्र प्रशासनानेही तेवढ्याच नेटाने कामे केली पाहिजेत. आ. टारफे म्हणाले, दुष्काळामुळे कृषी विभागाने अनुदानावर बी-बियाणे दिले पाहिजे. शिवाय पालकमंत्र्यांनी आदेश देवूनही टँकर सुरू होत नाही. मागेल त्याला शेततळे नुसते मंजूर झाले. कामांचा पत्ता नाही. जलयुक्तची कामेही गतिमान होणे गरजेचे आहे. प्रास्ताविक लोंढे यांनी तर आर. बी. हरणे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)