बीडमध्ये मंदिरात चोरी

By Admin | Updated: December 3, 2015 00:37 IST2015-12-02T23:50:08+5:302015-12-03T00:37:36+5:30

बीड : शहरातील पेठ बीड हद्दीत असलेल्या यशवंत उद्यानातील हनुमान मंदिरात चोरट्यांनी मूर्तीच्या अंगावरील दागिणे चोरुन नेल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

Theft in the temple at Beed | बीडमध्ये मंदिरात चोरी

बीडमध्ये मंदिरात चोरी


बीड : शहरातील पेठ बीड हद्दीत असलेल्या यशवंत उद्यानातील हनुमान मंदिरात चोरट्यांनी मूर्तीच्या अंगावरील दागिणे चोरुन नेल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. हनुमान मंदिरासह चोरट्यांनी संतामाई मंदिरातील साऊंड सिस्टीमसह असा एकुण तीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. मात्र, या प्रकरणी पेठ बीड ठाण्यात रात्री उशीरा पर्यंत तक्रार आली नसल्याने गुन्हा दाखल झाला नव्हता.
पेठ बीड हद्दीतील बिंदुसरा नदीच्या शेजारी असलेल्या यशवंत उद्यात दक्षिणमुखी हनुमान मंदिर आणि संतामाई मंदीर आहे. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिराची खिडकी उचकुन आतमध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी हनुमानाच्या मुर्तीच्या अंगावरील मुकूट, गंध आणि अन्य चांदीचे दागिणे काढून घेत पळ काढला. त्यानंतर चोरट्यांनी जवळच असलेल्या संतामाई मंदिराकडे मोर्चा वळविला. तेथून साऊंड सिस्टीम चोरली. बुधवारी सकाळी पुजारी आले असता त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ही बाब मंदीर कमिटीच्या सदस्यांना कळवली.
वसंत अप्पा ढेपे, पवन रमेश लाहोट, पवन परदेशी, मंगेश मानकुश, गजानन मानकुश, सचिन मोहारे आदींनी या घटनेचे माहिती पेठ बीड ठाण्यात जाऊन पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्ळाचा पंचनामा करुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध पेठ बीड ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Theft in the temple at Beed