शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

महिलेला विष पाजून दागिण्यांची चोरी

By admin | Updated: August 10, 2015 00:58 IST

लातूर : लातूर शहरानजीक असलेल्या महापूर गावात एका महिलेस विष पाजून तिच्या अंगावरील चार तोळ्यांचे दागिने चोरुन चोरट्याने पोबारा केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली.

लातूर : लातूर शहरानजीक असलेल्या महापूर गावात एका महिलेस विष पाजून तिच्या अंगावरील चार तोळ्यांचे दागिने चोरुन चोरट्याने पोबारा केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. या प्रकरणी पतीच्या फिर्यादीनुसार रेणापूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ लातूर शहरानजिक असलेल्या महापूर गावात शुक्रवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घरी कोणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी एका महिलेला विष पाजले. बेशुद्ध झालेल्या महिलेच्या अंगावरील चार तोळ्यांचे दागिने काढून घेतले. दागिण्यांमध्ये नेकलेस, झुमके, मणी मंगळसूत्र असे एकूण चार तोळ्यांचे दागिने घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. घराशेजारी कोणीही नव्हते. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास लातूर येथे कामाला असलेल्या पतीने घरी फोन केला. मात्र फोन उचलला गेला नाही. वारंवार फोन केला. परंतु, प्रतिसाद मिळाला नसल्याने सायंकाळी गावाकडे गेल्यानंतर पत्नी बेशुद्ध असल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ पत्नीला लातूरच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्याही ती महिला बेशुद्धच आहे. याबाबत पती शिवकुमार भंगे यांनी रेणापूर पोलिसात फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेणापूर पोलिसांनी घटनास्थळी व रुग्णालयात जाऊन पाहणी केली असून, तपासासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले असल्याचे रेणापूर पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)विष पाजून चार तोळे सोन्याचे दागिने घेऊन चोरट्याने पोबारा केल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली़ दरम्यान, सदरील महिलेला उपचारासाठी लातूरच्या एमआयटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, सदरील महिला मृत्यूशी झुंज देत आहे. प्रकृती गंभीर असल्याने नातेवाईक चिंतेत आहेत. शुक्रवारी घटना घडूनही पोलिसांत गुन्हा मात्र रविवारी दाखल झाला. महापुरात सध्या या घटनेमुळे भीतीचे वातावरण आहे.